महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना निवडून आणणे हे आमचे सामुहिक जबाबदारी... समाजभूषण दिलीप जाधव...


 
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना निवडून आणणे हे आमचे सामुहिक जबाबदारी... समाजभूषण दिलीप जाधव...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

बुलढाणा विधानसभेसाठी जयश्रीताई शेळके ह्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असून त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी तील सर्वच घटक पक्ष त्यांच्या विजयासाठी कटिबद्ध आहेत..विचारांची बांधिलकी जपणाऱ्या जयश्रीताईंना निवडून आणणे ही आमची सामूहिक जबाबदारी ठरते. संविधानाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने जयश्रीताईंना निवडून आणण्याचा कसोशीने प्रयत्न करावा असे आवाहन समाजभूषण दिलीपभाऊ जाधव यांनी केले.महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांची प्रचार रॅली आज बुलढाणा शहरातील सुंदरखेड परिसरात आयोजित करण्यात आली होती.यावेळी रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले.  नालंदा बौद्ध विहार या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  काँग्रेसचे नेते सुनील सपकाळ होते.पुढे बोलताना दिलीपभाऊ म्हणाले,  राजकीय व्यक्ती आपले राजकारण डोळ्यापुढे ठेवून कार्य करतात. मात्र जयश्रीताई शेळके यांनी असा विचार कधीच केला नाही. त्यांनी वेगवेगळे प्रयोग जिल्ल्याच्या ठिकठिकाणी केले. जसे संत्रा प्रक्रिया उद्योग त्यांनी संग्रामपूर तालुक्यात उभारला. सिंदखेड राजाला चित्रपट नगरी सुरू केली. त्यांचा मतदारसंघ बुलढाणा आणि काम केले ते वेगवेगळ्या ठिकाणी. सिंदखेड राजाला त्यांनी कृषी मेळावा घेतला. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून दिली.दरवर्षी येथे त्या कार्यक्रम घेतात. महिला बचत गट प्रदर्शनी त्यांनी बुलढाण्यात घेतली. यावरून त्यांची व्यापकता लक्षात येईल. राजकारण हे त्यांचे ध्येय कधीच राहिले नाही. त्यापलीकडे जाऊन समाजकारणाचा विचार त्यांनी सातत्याने केला आहे. त्यातही फुले शिव शाहू आंबेडकर विचारांची नाळ त्यांनी कायमची जपली आहे. संविधानिक मूल्य मानणाऱ्या व्यक्ती ह्या लोकशाहीसाठी आवश्यक असतात अन्यथा हुकूमशाही यायला वेळ लागत नाही. आजूबाजूला काय चालू आहे यावर फार बोलण्याची गरज नाही. डोळे उघडे ठेवून पाहिल्यास लोकशाही मूल्य जपली जातात का? हे आपल्याला दिसेल. हुकूमशाही टाळायची असेल तर संविधानिक जपणाऱ्या विचारांना बळ द्यावे लागेल असे ते म्हणाले. जयश्रीताई शेळके यांना निवडून आणणे ही संविधान मांनणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून त्यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

Previous Post Next Post