●महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ ●तिर्थक्षेत्र स्थळी नारळ फोडून होणार शुभारंभ ●जळगाव जा येथून प्रारंभ तर शेगाव येथे समारोप...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांच्या प्रचाराचा उद्यापासून 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.15 वा शुभारंभ होत आहे. त्याअनुषंगाने जळगाव ,संग्रामपूर,व शेगाव या तिनही तालुक्यातील प्रमुख तिर्थक्षेत्राचे स्थळी नारळ फोडून दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
जळगाव जा येथून प्रारंभ तर शेगाव येथे समारोप होईल.
याप्रसंगी सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी,सर्व महायुतीच्या आघाड्यांचे, मोर्च्यांचे, प्रदेश, जिल्हा,तालुका व शहर पदाधिकारी,सर्व सन्माननीय शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोर्चा पदाधिकारी यांनी दिनांक 4/11/2024 रोजी जळगाव जामोद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. संजय श्रीराम कुटे यांच्या प्रचारार्थ पवित्र तीर्थक्षेत्रांचे ठिकाणी उपस्थित राहावे,असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
● असा राहील प्रचार शुभारंभाची वेळ...
●दुपारी 12.00 वा.
श्री अंबिका माता मंदिर, जळगांव जामोद
●दुपारी 1.00 वा.
श्री सुपो महाराज संस्थान, पळशी सुपो
●दुपारी 1.30 वा.
श्री महासिध्द महाराज संस्थान, धानोरा
●दुपारी 2.00 वा.
श्री आवजीसिध्द महाराज संस्थान, सुनगांव
●दुपारी 2.30 वा.
श्री दत्त मंदिर संस्थान, मडाखेड खुर्द
●दुपारी 3.00 वा.
श्री सखाराम महाराज संस्थान, इलोरा
●दुपारी 3.30 वा.
श्री शंकरगिरी महाराज संस्थान, पळशी झाशी
●दुपारी 4.00 वा.
श्री सोनाजी महाराज संस्थान, सोनाळा
●दुपारी 4.30 वा.
श्री गुलाबबाबा संस्थान, काटेल धाम
●सायं. 5.00 वा.
श्री आई जगदंबा माता संस्थान, वानखेड
●सायं. 6.00 वा.
श्री जगदंबा माता संस्थान, मनसगांव
●सायं. 7.00 वा.
श्री गोमाजी महाराज संस्थान, नागझरी
●रात्री 7.30 वा.
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव
