भारतीय बौद्ध महासभा जळगावच्या वतीने निवेदन देत केला परभणी येथील घटनेचा निषेध...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
परभणी येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तालुक्यातील भारतीय मुद्दे महासभा च्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे महामयम राज्यपाल तथा मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.परभणी येथे १० डिसेंबर २०२४ रोजी देशद्रोही समाज कंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली आहे. या देशद्रोही कृत्याचा दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाज कंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्या नुसार कठोर कारवाई करावी. आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टर माईंड चा शोध घेण्यात यावा. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकर वाद्याचा मृत्यू झाला आहे तो पी सी आर मध्ये होता. तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी.तसेच याप्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलिस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना व्देष भावनेतून अमानुष मारहाण केली आहे. त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी. आणि बौद्ध समाजावर व्देष भावनेतून केले जात असलेले "कोंबिंग ऑपरेशन" त्वरित थांबवावे अशा आशयाचे निवेदन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक १६ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते राज्यपाल, मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांना देण्यात आले.सदर निवेदनावर विशाखा सावंग जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन महीला आघाडी, जगदीश हातेकर तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, अनन्य वानखडे, मधुकर गवई, भास्कर जुमळे, परमेश्वर पारवे, संघपाल गुरचळ, साहेबराव भगत, तानाजी गवळी, महादेव पातोंडे भीमराव येरवडे,सागर गवळी रमेश नाईक, द्रोपदा तायडे, आशाबाई तायडे, मंदाबाई तायडे, सुनिता हेलोडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
