एकजूट हीच खरी ताकद ना.अँड.आकाश दादा फुंडकर.. •समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर-माजीमंत्री आ डॉ.संजय कुटे.. बारी समाज उपवर वधू परिचय मेळावा उत्साहात संपन्न...


 
एकजूट हीच खरी ताकद ना.अँड.आकाश दादा फुंडकर..
•समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर-माजीमंत्री आ डॉ.संजय कुटे..

 बारी समाज उपवर वधू परिचय मेळावा उत्साहात संपन्न... 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

माजी मंत्री आ.डॉ डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नामुळे बारी समाजाच्या महामंडळाच्या प्रयत्नाला यश आले असून समाजाच्या एकत्रीकरणामुळे महामंडळच काय तर  समाजाच्या एकत्रित करणामुळे आता बारी समाजाचे कोणतेही कामे मागे राहणार नाहीत अशी स्पष्ट ग्वाही महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. अँड आकाश दादा फुंडकर यांनी राज्यस्तरीय बारी समाज वधू वर परिचय मेळाव्या प्रसंगी बोलताना दिली.बारी समाजाचे अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रुपलाल महाराजांचे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक  लवकरात लवकर  निर्माण होणार आहे, बारी समाज आर्थिक विकास महामंडळ  सुद्धा कार्यान्वित करण्यासाठी माझे प्रयत्न  सुरू असून यामाध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधल्या जावा यासाठी सदैव तत्पर  राहील अशी ग्वाही माजी मंत्री तथा आमदार डॉ.संजयभाऊ कुटे यांनी परिचय मेळाव्यात  बोलताना दिली.दिनांक 22 डिसेंबर रोजी शेगाव येथील अग्रेसन भावना मध्ये मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ मुंबई व महिला समिती यांच्या वतीने 17 वा राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक अस्वार होते. तसेच प्रमुख पाहुणे  पोलीस अधीक्षक मुंबईचे दिनेश बारी, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. आकाशदादा फुंडकर, जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे, अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र घोलप, बारी समाज भूषण डॉ. एस. के.  दलाल, मुंबई मंत्रालयीन उपसचिव शिवदास धुळे, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. व्ही. एन. डाबरे, मुंबई मंडळाचे सचिव सुरेश ढगे, उपाध्यक्ष शैलेश पायघन, कोषाध्यक्ष गजानन केदार, सदस्य प्रवीण डाबरे, प्रवीण कोथळकर, वसंत ढगे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य गुणवंत कपले, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश काळपांडे, अमरावतीचे विलास सातपुते, बुलढाण्याचे अनिल हिस्सल, माजी सभापती पांडुरंग हागे,  प्रा. डॉ. अशोक भुते, माजी उपसभापती सुभाष हागे, बारी समाज विकास ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष ओंकार काटोले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुकाराम  काळपांडे एकलारा ग्रा.प.च्या सरपंच सौ. भारतीताई अस्वार, मुंबई महिला मंडळाच्या सौ. ज्योतीताई धर्मे, अवधूत कोल्हे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी रतन पुसे, अशोक काळपांडे, डॉ. गणेश दातीर,  शेगावचे पंडित हागे,  ईश्वर धामणे, गजानन राजस, मिलिंद अस्वार, चंद्रपूरचे सुरेश बोडणे, प्रमोद पोके, , माजी सरपंच बळीराम धुळे, पवन अस्वार विजय कुऱ्हाडे, सरपंच पंकज मिसाळ, बोर्डी चे संदिप ताडे जळगावचे नगरसेवक श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे,  सखाराम ताडे पवन  आदी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला श्री संत गजानन महाराज, बारी समाजाचे संत श्री संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुंबई मंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक फोर्सवन मुंबईचे डॉ. दिनेश बारी, मंत्रालयीन उपसचिव मुंबईचे शिवदास धुळे यांच्या हस्ते कामगार मंत्री ना. अँड. आकाशदादा फुंडकर व जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांचा  शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवराचे हस्ते परिचय मेळावा महोत्सव नव्या नात्याचा या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या परिचय पुस्तिकेत एकूण 354 मुलींची तर 282 मुलांची नावे नोंदल्या गेली, यापैकी एकूण 370 उपवर वधूंनी स्टेजवर जाऊन आपला परिचय समाज बांधवांना करून दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. अशोक भुते यांनी तर परिचय सत्राचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश पायघन यांनी केले, आभार मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक अस्वार यांनी मानले.

Previous Post Next Post