सलोना येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार केवलाराम काळे यांच्या हस्ते संपन्न...


 
सलोना येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार केवलाराम काळे यांच्या हस्ते संपन्न...

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना येथे दि. ३०/१२/२०२४ ला मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते पाच रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असुन या पाच रुग्णवाहिका चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना, सेमाडोह, टेब्रुंसोंडा, काटकुंभ आणि हतरु येथे देण्यात आले आहे. या रुग्णवाहिकाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून सौ आरती बेलसरे सरपंच ग्रापंचायत सलोना प्रमुख अतिथी शिवशंकर भारसाकडे गटविकास अधिकारी चिखलदरा हे होते तर कार्यक्रम आयोजक म्हणून डॉ आदित्य पाटील तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा हे होते.तसेच स्वागतउत्सुक म्हणुन डॉ. केशव कंकाळ वैद्यकीय अधिकारी सलोना डॉ .गणेश पाटील वैद्यकीय अधिकारी सेमाडोह,डॉ.राकेश अलोकार वैद्यकीय अधिकारी काटकुंभ,डॉ मानसी तुंमरे मेडिकल युनिट ,श्री रंगलालजी भिलावेकर आरोग्य विस्तार अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत आज प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना येथे संपूर्ण तालुक्यात उपलब्ध झालेल्या पाच रुग्णवाहिका यांचा माननीय श्री आमदार केवलरामजी काळे मेळघाट विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा  प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून आणि रिबीन कापून सर्व वाहनांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. त्यावेळेस त्यांनी आपले मनोगत तसेच सर्व अधिकारी  व कर्मचारी यांना मार्गदर्शन पद सूचना देण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थिती डॉ  विशाल दाभाडे,श्री गजानन सूने, श्री अशोक सुरत्ने, श्रीमती शालिनी लकडे, श्री सुरेश धुळे, श्री प्रशांत तंतरपाडे, श्री अतुल खळसे, श्री सुनील रोकडे,श्री स्वप्निल चवरे, श्री अभिजीत कांबळे, रेणुका झारेकर, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी रुंद,  सर्व वाहन चालक,आशा वर्कर व गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण रमेशपंत निंभोरकर आरोग्य सेवक यांचे कडून करण्यात आले

Previous Post Next Post