राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न___विद्यार्थ्यांनी श्रमाचे मूल्यजोपासून आयुष्यातील पुढील वाटचाल करावी__ गुलाबराव इंगळे..
जळगाव (जामोद) प्रतिनिधी....
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या समाजाला फार मोठी शिकवन दिली आहे. त्यांनी दिलेली शिकवणच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अमलात आणली जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, हुंडाबळी, नरबळी बालविवाह आदी अनिष्ट रूढी आणि परंपरेच्या विरोधात जनजागृती ह्या संतांनी केली. माणसाने माणसाशी माणसासम जगण्याची शिकवण सुद्धा दिली. जीवनात श्रमाला अन्यनसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमाचे मूल्य जोपासून आयुष्यातील पुढील यशस्वी वाटचाल करावी, असे प्रतिपादक व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव इंगळे यांनी केले. ते दिनांक १९ डिसेंबर रोजी स्व.उदयभानजी धुंदाळे संस्थापित समता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित आडोळ येथील मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात तालुक्यातील ग्राम मोहिदेपूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.संस्थेच्या संचालिका सौ.विशाखाताई धुंदाळे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर ज्येष्ठ पत्रकार सागरकुमार झनके, ग्रामविकास अधिकारी विजय ढगे, प्राचार्य मंगेश धांडे, मुकुल वासनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ठोंबरे सर, त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य विद्या काटले , राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा . जयश्री भीवटे यांची ह्यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्राचार्य काटले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट विशद केली. संस्थेचे संस्थापक स्वर्गीय यु. बी. धुंदाळे बाबाजी यांनी आसलगाव ,आडोळ सारख्या गावात शिक्षणाची गंगोत्री आणून ह्या परिसरातील विद्यार्थ्यांची तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा करून दिला, असे मत प्राचार्य मंगेश धांडे यांनी व्यक्त केले.आपण जीवनात अनेक संघर्ष केले चढ-उतार पाहिले पण आपल्याला घडवण्यात मुकुल वासनिक विद्यालयाचा फार मोठा वाटा आहे. ह्या शाळेतील गुरुजनांचे प्रति आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी सुद्धा श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून यशाची शिदोरी घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादक जेष्ठ पत्रकार सागर कुमार झनके यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या शम श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. विद्यार्थी हा उद्याचा सुसंस्कृत नागरिक आहे त्याची घळण दळण या शिबिरातून होते असे मत ग्रामविकास अधिकारी विजय ढगे यांनी मांडले.मुख्याध्यापक विनोद ठोंबरे , कार्यक्रम अधिकारी जयश्री भीवटे मॅडम, जि प शाळेचे मुख्याध्यापक भगवान खिरळकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. पळशी सुपोचे सरपंच उमेश कोकाटे, उपसरपंच अंभोरे, पोलीस पाटील शिंदे,शाळा समितीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थ्यांची ह्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मंगेश धांडे सर तर आभार प्रदर्शन तायडे सर यांनी केले. मुकुल वास्तविक विद्यालयातील विद्यार्थी गटप्रमुख सौरव ससाने विद्यार्थिनी गटप्रमुख कांचन पाटील आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
________________
दिनांक १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर असे संपूर्ण सप्ताहभर चालणाऱ्या ह्या शिबिराला शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ. नीलिमा टाके शिक्षण उपनिरीक्षक अमरावती, राज्य जनसंपर्क अधिकारी मंत्रालय मुंबई, प्रा.विशाल जाधव विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना, श्री अकाळ साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक बुलढाणा, जगन मुंडे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, प्रा.नीलकंठ राठोड, जिल्हा समन्वयक रो से यो बुलढाणा, प्रा. आनंद धुंदाळे, सचिव समता बहुउद्देशीय शिक्षण संस्था जळगाव जामोद ही मंडळी ह्या श्रमसंस्कार शिबिराला सदिच्छा भेटी देणार आहेत.
