दि.न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप...स्वयंसेवकांनी श्रममुल्यांची जोपासना करावी-सचिव पुराणिक
जळगाव जामोद प्रतिनिधी-:
आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात श्रमाचे महत्त्व अत्यंत कमी होत असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून श्रममूल्यांची जोपासना करून राष्ट्रहिताच्या दृष्टीने कार्य करावे, असे प्रतिपादन जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक यांनी केले.दी न्यू इरा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, जळगाव-जामोदच्या वतीने निमखेडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिस्तीचे महत्त्व विशद केले. जळगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शिबिरात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग गेला घेतला, त्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. संचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल डाबरे यांनी केल; तर राष्ट्रीय सेवा योजना बुलढाणा जिल्हा समन्वयक प्रा. निळकंठ राठोड यांनी आभार मानले.दि.न्यु.ईरा कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाचे वतीने दिनांक १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत आदिवासीग्राम निमखेडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिस्त किती महत्त्वाची आहे याची जाणीव सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना करून दिली. याप्रसंगी शिबिरामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या व स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग गेला घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिस वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल डाबरे यांनी, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे बुलढाणा जिल्हा समन्वयक प्रा. निळकंठ राठोड यांनी केले.
