आगामी निवडणुकांच्या विजयासाठी सदस्य नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवा-- ना. अँड. आकाश फुंडकर...


 
आगामी निवडणुकांच्या विजयासाठी सदस्य नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवा-- ना. अँड. आकाश फुंडकर...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

आगामी निवडणुकांच्या विजयासाठी भाजपा सदस्य नोंदणी अभियान 2024 यशस्वीपणे राबवा असे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. अँड आकाश फुंडकर यांनी केले .संपूर्ण भारतासह महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान 2024 राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात विशेषता 1 ते 15 जानेवारी पर्यंत हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची भाजपा खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज दिनांक 31 डिसेंबर रोजी स्थानिक कोल्हटकर स्मारक सभागृहात पार पडली. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना.अँड. आकाश फुंडकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सागरदादा फुंडकर, ज्येष्ठ नेते तथा साहित्यिक राम दादा मोहिते, गजाननराव देशमुख होते. त्यांचे सह मंचावर खामगाव विधानसभा विस्तारक डॉ. एकनाथ पाटील, जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी, चंद्रशेखर पुरोहित, जिल्हा सचिव राजेंद्र धनोकार, खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, खामगाव तालुकाध्यक्ष विलासराव काळे, शेगाव तालुकाध्यक्ष हेलगे ,युवा मोर्चा प्रदेश सचिव राम मिश्रा,खामगाव मतदार संघ युवा मोर्चा संयोजक पवन गरड ,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव मानकर डॉ.गजानन उन्हाळे ,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाळ, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद कस्तुरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोषराव देशमुख ,सौ अनिता देशपांडे ,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ रेखा घोंगे , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राज टिकार,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष प्रत्येक मुंडे,  आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खामगाव मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलताना ना. अँड. आकाश फुंडकर पुढे म्हणाली की विधानसभेचे अभूतपूर्व यश प्राप्त झाले. त्यानंतर माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने मंत्री मंडळात स्थान दिले हे आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. प्रत्येक बुथवर आपण घेतलेल्या मेहनतीमुळे चांगल्या फरकाने आपण जिंकलो. परंतु आपला बूथ येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यामुळे आपला जल्लोष संपला असे समजून येणाऱ्या निवडणुकीसाठी आपला बूथ अधिक सक्षम करण्यासाठी या सदस्य नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून आजपासूनच कामाला लागा. प्रत्येकापर्यंत पोहोचून त्याला 88000020240 या क्रमांका वर मिस कॉल करून भाजपाचा सदस्य बनवा व पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष बनवा असे  आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच आपला बूथ सबसे मजबूत हा प्रत्येक निवडणुकीचा विजय मंत्र आहे. हाच मंत्र वापरून आपला बूथ आधीपेक्षा अधिक सक्षम करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान हा महत्त्वाचा दुवा असणार आहे. त्यामुळे या अभिनयाच्या माध्यमातून शेकडो हजारो मतदारांना आपल्या भाजपच्या प्रवाहात आणा जेणेकरून येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला सोयीच्या जातील त्यामुळे सदस्य नोंदणी अभियानात स्वतःला झोकून द्या असे आवाहन यावेळी सागरदादा फुंडकर यांनी केले. तत्पूर्वी डॉ. एकनाथ पाटील, चंद्रशेखर पुरोहित यांनी सदस्य नोंदणी संदर्भात उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खामगाव तालुका अध्यक्ष विलास काळे, संचालन भाजपा जिल्हा महामंत्री तथा सदस्य नोंदणी प्रमुख शरदचंद्र गायकी तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव राजेंद्र धनोकार यांनी केले. या कार्यशाळाला खामगाव मतदार संघातील सक्रिय सदस्य, बूथ प्रमुख तथा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केले अभिवादन...

प्रसिद्ध अर्थतज्ञ तथा भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भाजपाच्या वतीने आजच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत अभिवादन करण्यात आले. राज्याचे कामगार मंत्री ना. अँड. आकाश फुंडकर यांच्यासह मंचावरील उपस्थित मान्यवर व उपस्थित सर्व भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन मिनिट  मौन धारत अभिवादन करून राष्ट्रीय शोक व्यक्त केला.

Previous Post Next Post