पोलीस वर्धापन दिनी भव्य रक्तदान शिबीर...56रक्तदात्यांनी केले रक्तदान..विद्यार्थ्यांच्या पथनाट्याने वेधले सर्वांचे लक्ष...
अर्जुन खिरोडकार/ हिवरखेड...
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या घोषवाक्या प्रमाणे तब्बल 56 रक्तदात्यांनी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे रक्तदान केले.दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण पोलीस स्थापना सप्ताह 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने प्रथम दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे सकाळी 11.00 ते 3.00 या वेळेत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय विद्यार्थ्यांनी महिला अत्याचाराच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशनच्या आवारात पथनाट्य सादर केले या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड होते. सदरहू संपूर्ण सप्ताहात पोलिस स्टेशन तर्फे दररोज विविध उपक्रक्रम राबविण्यात येणार आहेत . दिनांक 2 जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात हिवरखेड आणि परिसरातील अडगाव, खंडाळा , सौंदला, हिंगणी , तळेगाव तसेच इतर गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवून तब्बल 56 नागरिकांनी रक्तदान सर्व श्रेष्ठ दानात आपले योगदान दिले.रक्तदान शिबिर व इतर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ठाणेदार गजानन राठोड, पीएसआय श्रीराम जाधव, प्रफुल्ल पवार, महादेव नेवारे, गजभार, संपूर्ण पोलीस बांधवांसह होमगार्डचे जवान, पोलीस पाटील शिक्षक वृंद पत्रकार बांधव, गावातील गणमान्य व जागरूक नागरिक, प्रयोगशील शिक्षक तुळशीदास खिरोडकार अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरज चौबे, सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यासह जागरूक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
_________________________________________
रक्तदान हि काळाची गरज असून रक्तदान हे जीवनदान समजल्या जाते. हिवरखेड रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचे पोलीस विभागाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करून धन्यवाद देतो.
गजानन राठोड ठाणेदार पोस्टे हिवरखेड.
