हज्जन जैतूनबी बापूमिया पटेल यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त हिमोग्लोबिन, रक्तगट तपासणी शिबिर व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल यांच्या मार्गदर्शनात हज्जन जैतूनबी बापूमिया पटेल यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी सुध्दा रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. हमीद पटेल माजी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग संसदीय कार्य महाराष्ट्र शासन व माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे होते तर उद्घाटक म्हणून विजय अंभोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे होते. ॲड. हमीद पटेल यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये आई-वडिलांच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून सतत परिश्रम व अभ्यास करून यश प्राप्त करावे. तसेच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट मार्ग न वापरता अभ्यास करूनच यश मिळवावे असे सांगितले. आपल्याकडील असलेल्या संसाधनांचा योग्य वापर शिक्षणामध्ये करावा.असे आवाहन केले. मातोश्री हज्जन जैतूनबी बापूमिया पटेल यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केले. संस्थेने यावर्षी पासुन प्रथमच परिसरातील राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रसेवे बाबत विशेष कार्य केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार व युवकांसाठी प्रेरणा ठरलेल्या युवकांना संस्थेने युवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यामध्ये. ह भ प भिकाजी सुरळकर महाराज यांना राष्ट्रीय सदभावना पुरस्कार 2025 तर डॉ राहील शेख शाकीर, डॉ अक्षय गजानन उगले, व मोहम्मद फरहान मोहम्मद नइम , मयुरेश मनीष सातव, मंगलसिंग दिवाणसिंग वतपाळ, राजीक रफिक देशमुख, मोहम्मद उमेर अहमद शेख अय्युब यांना युवा रत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तेजस्विनी पाखरे निकिता सोनूणे, संकेत रामदास सरोदे, फिरोज अकबर शोले, आरती रमेश खंडागळे हे होते. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती संदीप मोरे गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव, दस्तगीरजी पटेल, मौलाना हाफिज मंजूर शबानाबी हमिदजी पटेल, तब्बसूम सलीम पटेल, सुजाताबी पटेल, फाईनिदा देशमुख, आशाबी देशमुख,संस्थेचे सहसचिव रब्बानी देशमुख, संचालिका परविन ताई देशमुख, बाबूलालजी देशमुख,संचालक सिराजोद्दीन पटेल, अनम पटेल, पळशी वैद्य चे उपसरपंच निलेश भोपळे, दरबारसिंग जाधव महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख फराह, नवाज देशमुख उपस्थिती लाभली होती.महाविद्यालयातील 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. रक्तगट तपासणी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व हिमोग्लोबिन तपासणी प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रा. मुकुंद इंगळे व आभार प्रदर्शन प्रा.अतुल उगले यांनी केले.
