शेतीच्या जुन्या वादावरून एकाचा खून तर एक गंभीर जखमी...आरोपी फरार
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शेत जमिनीच्या जुन्या वादावरून 40 वर्षीय इसमाचा डोक्यामध्ये कुराडीने वार करून निर्गुण खून केल्याची घटना दि 17 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारात माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये घडली.याबाबत वृत्त असे की जलंब पोस्ट अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये भास्तन येथील शत्रुगुण मिरगे व त्याच्या चुलत भावामध्ये शेत जमिनीचा वाद होता या वादावरून दि. 17 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघुन मिरगे यांच्या डोक्यामध्ये कुराडीने वार करून खून करण्यात आला आहे. तर त्याची साळी तिला सुद्धा कुराडीने वार करून गंभीर जखमी केले आहे. घटनेची माहिती समजतात ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.व त्या जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीने बसून उपचारासाठी रवाना करण्यात आले. तर इसमाला खाजगी वाहनाने खामगाव येथे नेण्यात आले.
