जादूटोणाच्या संशयावरून मेळघाट मधील महिलेची गावातुन धींड तक्रार दाखल.... गुन्हा केवळ मारहाणीचा...


 
जादूटोणाच्या संशयावरून मेळघाट मधील महिलेची गावातुन धींड तक्रार दाखल.... गुन्हा केवळ मारहाणीचा...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला जादू टोण्याच्या संशयावरून तिची गावात नग्न धिंड काढण्यात आली, यावेळी संपूर्ण गाव आहे केवळ बघ्याच्या भूमिकेत होते.रेहट्याखेडा येथील काढणी नंदराम शेलूकर अशी या पिढीत वृद्ध महिलेचे नाव असून तिने मुलांसह सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली.मात्र पोलिसांनी केवळ महाराणीचा गुन्हा दाखल केला.या पीडित महिलेचे मुलं राजकुमार शेलुकर व शामू शेलुकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली.या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनोरी येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती. यांच्या चार एकर शेतात गावातील पोलीस पाटलांनी थेट अंगणवाडी देखील बांधाचा आरोप या शेलूकर कुटुंबीयांनी केलेला आहे. वृध्द महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहितेनुसार काही मारहानीचे गुन्हे दाखल केले,मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचे संपूर्ण चौकशी केली जाईल व त्यानंतर जादूटोना संदर्भात गुन्हे लावले जातील असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.

Previous Post Next Post