महिलेच्या पोटातून काढली चरबीची मोठी गाठ, ठाकरे हॉस्पिटलमध्ये जटिल शस्त्रक्रिया यशस्वी...!


 
महिलेच्या पोटातून काढली चरबीची मोठी गाठ, ठाकरे हॉस्पिटलमध्ये जटिल शस्त्रक्रिया यशस्वी...!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

खामगाव  येथील ठाकरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर मध्ये पोटाची अतिशय जटिल शस्त्रक्रिया यशस्वी पणे करण्यात आली असून महिलेच्या पोटातून चरबीची मोठी गाठ काढण्यात आली आहे. उपचारानंतर महिला सुखरूप असून तिची प्रकृती सुद्धा चांगली आहे. हॉस्पिटल रुग्णसेवेत रुजू झाल्या नंतर ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आहे.मोताळा तालुक्यातील धाड येथील ताई बाई शिवाजी सरोडकर या 55 वर्षीय महिलेला तीन महिन्यापासून पोटात खूप दुखत होते. पोटाचा खूप त्रास वाढल्याने त्या नेहमी आजारी राहत असत. नातेवाईकांनी त्यांना सहा जानेवारी रोजी सायंकाळी खामगाव येथील ठाकरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटरमध्ये दाखल केले. डॉक्टर निखिल ठाकरे यांनी महिलेची तपासणी करून (lipoma Right Hypochondriac) 12x7x6 cm पोटात चरबीची मोठी गाठ असल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ठाकरे हॉस्पिटल मधील अद्यावत ऑपरेशन थिएटर मध्ये 7 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता डॉ समृद्धी मेंढे यांनी ही शस्त्रक्रिया केली. महिलेच्या पोटातून दहा बाय पाच सेंटिमीटर ची चरबीची गाठ काढण्यात आली. ही जटिल शस्त्रक्रिया ठाकरे हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. डॉक्टर ठाकरे यांनी महिलेवर योग्य ते उपचार केले आणि त्यांची प्रकृती स्वस्थ झाल्यावर सुट्टी देण्यात आली. ठाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर मधील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी रुग्ण महिलांच्या नातेवाईकांनी आभार मानले.

____________________________

 ठाकरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर मध्ये अद्ययावत आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे. सर्वच प्रकारच्या सर्जरी, अपेंडिक्स हर्निया, पित्ताशयाचे आजार, अपघात, हाडांच्या शस्त्रक्रिया व उपचार या ऑपरेशन थिएटर मध्ये यशस्वीरित्या केल्या जातात.

- डॉ निखिल ठाकरे,एम डी., इन्सेंटिव्ह कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट व डायबिटोलॉजिस्ट

-----

Previous Post Next Post