व्हाईस ऑफ मिडीया डिजिटल विंगच्या संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी दयालसिंग चव्हाण !


 
व्हाईस ऑफ मिडीया डिजिटल विंगच्या संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी दयालसिंग चव्हाण ! 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

व्हाईस ऑफ मिडीयाची संग्रामपूर तालुक्यातील वरवट (बकाल) येथे शिक्षक सोसायटीचे सभागृहात बैठक पार पडली.या बैठकीत व्हाईस ऑफ मिडियाची डिजीटल विंगच्या संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी मराठी माझा न्यूज चँनलचे दयालसिंग चव्हाण ह्यांची नियुक्ती करण्यात आली.अशी घोषणा जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी तालुका कार्यकारणी बैठकीत केली आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी तर प्रमुख म्हणून जिल्हाअध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा सरचिटणीस सुनिल तिजारे यांच्यासह तालुक्यातील जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने, प्रल्हाद दातार, काशीनाथ मानकर, किशोर खडे,मकसुद अली , आकाश पालीवाल हे होते. मंचकावरील मान्यवरासह जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी नवनियुक्त दयालसिंग चव्हाण यांची डिजिटल विंगच्या तालुकाध्यक्ष पदी दयालसिंग चव्हाण यांची नियुक्ती करून त्यांचा पुष्पहाराने सत्कार केले.ह्यावेळी,सागर कापसे, संतोष देऊकार,सुचित धनभर,शेख अब्दुल,विवेक राऊत, मतीन शेख, रवी सिरस्कर,नंदू शिरसोले, युसूफ शेख, ज्ञानेश्वर दांदळे, स्वप्नील देशमुख, संतोष आगलावे, शेख कदीरभाई, साबीर खान,दयालसिंग चव्हाण, अशोक आकोटकार यांच्या सह संग्रामपूर तालुक्यातील 30-35 पत्रकार बांधव या वेळी उपस्थित होते.मराठी माझा न्युज चॕनलचे काम करीत असतांना जिल्हा व तालुक्यासह मिडीया क्षेत्रात परिचित असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post