बुलढाण्याच्या बगाडे भगिनी ठरल्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी....


 
बुलढाण्याच्या बगाडे भगिनी ठरल्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी....

जळगाव जामोद प्रतिनिधी:-

कस्तुरी राईस फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी 2024 ची महाअंतिम प्रतियोगिता सोहळा पुणे येथे पार पडला. त्यामध्ये तनवी नीलिमा राजेश बगाडे कुमारी गटातून महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी म्हणून विजयी झाली. तर तिची लहान बहीण पारुल नीलिमा राजेश बगाडे ही युवराज्ञी या गटातून विजयी ठरली. कस्तुरी राईस फाउंडेशनच्या डायरेक्टर विजया मानमोडे मॅडम यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या सौंदर्य स्पर्धेचे परीक्षण सौ. उज्वला शैलेश काळे (महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी 2023 ) संगपाल तायडे (सुप्रसिद्ध वर्दीतला गायक) आणि प्रकाश धिंगाले (पाटलांचा बैलगाडा फेम) यांनी परीक्षण केले. स्पर्धेपूर्वी तीन दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले. हे प्रशिक्षण मयुरेश महाजन आणि हर्षदा गायकवाड यांनी दिले. तनवी आणि पारुल ही जळगाव जामोद येथील बुलढाणा अर्बन चे शाखा व्यवस्थापक नितीन उमाळे यांच्या भाच्या आहेत. तन्वी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देते.

Previous Post Next Post