पिंपळगाव काळे जि.प. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थांची विक्री..
मंगल काकडे/पिंपळगांव काळे...
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जि.प. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा येथे १ ते ५ विच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना कमवा व शिका याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते यात पाणीपुरी, भेळ, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, तिळाचे लाडू, आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. सर्वप्रथम प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी वामन फंड व पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच उषा चोखंडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जामोद पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी केले. या बाल आनंद मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला, मेळाव्याला जि.प.प्राथमिक कन्या शाळा, जि. प. मराठी प्राथमिक शाळा, जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा व शिक्षक तसेच सर्व उपस्थितांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी, पंचायत समिती कक्ष अधिकारी इंगळे, विस्तार अधिकारी राजपूत, ग्रामपंचायत सदस्य आशा कळस्कार,अशोक ढोले, व किशोर घटे, सुरेश चोखंडे, मंगल काकडे, केंद्रप्रमुख महादेव कुवारे, केंद्रप्रमुख सुधीर ठोंबरे, जि.प. हायस्कूल मुख्याध्यापक हेंडव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश मानकर, उपाध्यक्ष प्रमोद भोपळे, निलेश बहादरे, मुख्याध्यापिका शारदा खडे, रोहनकर, चव्हाण, पालवे, सुरळकर, हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली करिता मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी सर्वांनी प्रयत्न केले.
