जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या आदेशानुसार "रस्ता सुरक्षा अभियान" अंतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष ॲड. सलीम पटेल साहेब, सहसचिव रब्बानी देशमुख आणि महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. एफ. टी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक (जळगाव जामोद) प्रशांत झेंडगे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, वाहतुकीचे प्राथमिक नियम, अपघात टाळण्याचे उपाय आणि गतीमर्यादा पाळण्याचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, रस्ता सुरक्षेसाठी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांबाबत अनेक शंका विचारल्या. "ट्राफिक सिग्नल मोडल्यास कायद्यानुसार किती दंड आकारला जातो?", "वाहन चालवताना मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम कोणते?", "आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणत्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा?" यासारख्या प्रश्नांची उत्तरे पोलीस उपनिरीक्षक झेंडगे यांनी सविस्तर दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. एफ. टी. शेख होत्या. त्यांनी अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांना सांगितले की, "रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर अनिवार्य आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आपण जबाबदार नागरिक म्हणून रस्ता सुरक्षेचे भान ठेवले पाहिजे. तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा."कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. गायत्री पांडव हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपाली सिरसाट यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला नायब पोलीस कॉन्स्टेबल अमोल बोदडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके व सुपेश तायडे, आर. एस. पी. ऑफिसर पठाण सर यांचीही उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चेतन पलन व डॉ. नूर मोहम्मद, आय.क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. एस. ए. काझी इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन इंगळे, अक्षय तायडे व इतर यांनी प्रयत्न केले.
