जळगाव जामोद येथे पार पडली माळी महासंघाची आढावा बैठक संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दि.२/२/२०२५ रोजी माळी महासंघाच्या बैठकीचे आयोजन हे महसूल कॉलनी येथे एडवोकेट खिरोडकार यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीला जळगाव जामोद तालुक्यातील आणि शहरातील माळी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यापैकी मंचावर उपस्थित प्रदेशाध्यक्ष अरुणजी तिखे, प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब खिरोडकार वि .धी. आघाडी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष नाना कांडलकर, अधिकारी कर्मचारी आघाडीचे पी. पी. खिरोडकार बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग .दी. वानखडे डॉ. सतिश शिरेकार हे होते. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सामाजिक संघटनात्मक बांधणी कशाप्रकारे केली जाते या विषयावर मार्गदर्शन केले.समाजामध्ये सामाजिक काम करत असताना या संघटनेमध्ये विविध सेलच्या माध्यमातून ही संघटना अख्या महाराष्ट्रभर कार्यरत आहे. बैठकीमध्ये सु .रा. इंगळे सर आणि महादेव उखर्डा सातव सर यांनी राज्यशास्त्र मध्ये पी .एच .डी. ही ही पदवी मिळवल्यामुळे त्यांचा माळी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यापैकी अधिकारी कर्मचारी सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी पी .पी. खिरोडकार तर वैद्यकीय डॉ. सेलच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सतीश प्रल्हाद शिरेकार यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये मार्गदर्शन करताना माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुणजी तिखे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माळी महासंघाचे काम अख्या महाराष्ट्रभर मोठ्या जोमाने सुरू आहे. माळी महासंघाच्या या विस्तृत वटवृक्षामुळे आज पुणे येथील भिलेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून नावारूपाला येणार आहे. या स्मारकाची उभारणी होत आहे. माळी महासंघ या संघटनेमध्ये भरपूर राज्यभरामध्ये नवीन उद्योजक निर्माण होऊन औद्योगिक क्षेत्रांमध्ये त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केली आहे. जळगाव जामोद तालुक्यामध्ये मी डॉ. शिरेकार यांच्या सामाजिक कार्याबद्दल ऐकून होतो. अशा कार्यक्षम नेतृत्वाची गरज आज समाजातील प्रत्येक घटकाला, संघटनेला गरज आहे डॉ. शिरेकार यांच्या नियुक्तीमुळे अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक नवचैतन्याची लाट निर्माण होऊन डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला नवी ऊर्जा मिळेल. माळी महासंघाची संघटनात्मक बांधणी मजबूत होईल. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
