दिल्लीच्या विजयाचा जळगावात भाजपने केला फटाके फोडून व पेढे वाटून विजयी जल्लोष साजरा...


दिल्लीच्या विजयाचा जळगावात भाजपने केला फटाके फोडून व पेढे वाटून विजयी जल्लोष साजरा...

जळगाव जामोद प्रतिनिधी..

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री यांना धुळ चारत भाजपने भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकून दिल्या.भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल दिल्लीच्या मतदारांचे आभार मानत जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, अनिल जयस्वाल, प्रमोद कुटे, डॉक्टर किशोर केला, निलेश शर्मा, भाजप शहराध्यक्ष कैलास पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकरे,शुभम चंडाले,राम इंगळे,अशोक नानग्दे, पांडुरंग मिसाळ, शरद खवणे, सचिन कल्याणकर, वैभव जाधव, शाकीर खान, करणसिंग राजपूत, बाळू चव्हाण, उमेश येऊल, शैलेश मोदी यांच्यासह बहुसंख्या पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना उपस्थित होते.

Previous Post Next Post