स्वयंसिद्ध असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने सर्वसाधारण सभा संपन्न...
अकोला जिल्हा प्रतिनिधी...
अकोला येथे स्वयंसिद्ध असोसिएशन महाराष्ट्र तर्फे सर्वसाधारण सभेचे आयोजन दिनांक - ९ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी अकोला येथील दिल्ली दरबार हॉटेल, वाशिम बायपास रोड या ठिकाणी करण्यात आले. या सभेकरिता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली.या सभेमध्ये डॉ. खुशबू चोपडे मॅडम अध्यक्ष, स्वयंसिद्ध असोसिएशन महाराष्ट्र तसेच सिंहान अरुण सारवान सर सचिव, स्वयंसिद्ध असोसिएशन महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात ही सभा संपन्न झाली.या सभेकरिता बुलढाणा जिल्ह्याचे नेतृत्व राजेंद्रकुमार माणिकराव आटक यांनी केले. तर महिला प्रतिनिधी म्हणून कु. वैष्णवी अरुण सातव व कु. माधुरी गजानन सातव यांनी केले. या सभेमध्ये चालू वर्षाच्या संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा, तालुका नियंत्रकांची सुद्धा नेमणूक करण्यात आली असून १७ विषयावर सकारात्मक चर्चा होऊन ही सभा यशस्वीरित्या संपन्न झाली.
