जामोद मध्ये हळदी कुंकू आणि कर्तृत्वान महिलांनाचा सत्कार...महिला समन्वय समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
महिला समन्वय समिती द्वारे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त जामोद येथील जना मुक्ताई संस्थानमध्ये हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता... कार्यक्रमाला अपर्णाताई कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती... याप्रसंगी अपर्णाताई कुटे यांनी अहिल्याबाई होळकर यांनी समाजाचा विरोध पत्करून त्या काळामध्ये चांगल्या प्रकारे राज्य सांभाळले या विषयी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.... याप्रसंगी डॉ मोनिका गांधी व सौ प्रगतीताई भन्साली, सौ माधुरी जोशी यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती... याप्रसंगी रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांची भुसावळ रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल व सौ प्रिया सचिन हागे यांची महाराष्ट्र शासनाच्या प्राणी कल्याण समितीच्या मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.... सौ. प्रिया हागे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पुनम वाघमारे व सौ पुजा धुर्डे यांनी केले....
