जळगाव शहरातील विविध समस्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
समाजवादी पार्टी च्या वतीने जळगाव जामोद मुख्याधिकारी यांना जळगाव शहरातील विविध समस्या मार्गी लागाव्यात या मागणी करिता दिनांक ७ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले. यामध्ये जळगाव जामोद शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत.त्यामुळे नगरपरिषदेने या रस्त्याचे नवीन बांधकाम करावे तसेच डॉक्टर शेख यांच्या घरापासून राजा भर्तरीनाथ मंदिरापर्यंत तसेच सईद पैलवान यांच्या घरापासून ते वायलीवेस पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्यात यावे. तसेच प्रभाग क्रमांक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये घाण कचरा अडकून पडला आहे त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे त्यामुळे येथील घनकचरा व्यवस्थापन करून नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी, तसेच या परिसरात नवीन नाली बांधकाम करून महात्मा फुले शाळेजवळील नाल्यांमधील साचलेली घाण काढण्यात यावी यांसारख्या असंख्य मागण्या समाजवादी पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी आपल्या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.वरील मागण्या मान्य न झाल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.अशा आशयाचे निवेदन समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकतखान, तालुकाध्यक्ष मुश्ताक जमदार, जिल्हा संपर्कप्रमुख अब्दुल साबीर, गुड्डू मौलाना, आरिफ डीजे, सय्यद कमर, शेख शरीफ, शेख मजहर यांच्यासह बहुसंख्येने समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
