48 तासात मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा आंदोलन तीव्र करू..23 मार्च पासून आझाद हिंदच्या पंचफुलाबाई गवई उपोषणात सहभागी.जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांसह 11 नागरी समस्यांसाठी आझाद हिंदचा एल्गार.


48 तासात मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा आंदोलन तीव्र करू..23 मार्च पासून आझाद हिंदच्या पंचफुलाबाई गवई उपोषणात सहभागी.जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांसह 11 नागरी समस्यांसाठी आझाद हिंदचा एल्गार.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद हिंद ने जिल्ह्यातील ज्वलंत नागरी समस्यांसाठी 22 मार्चपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणामध्ये दुसऱ्या दिवशी 23 मार्चला आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई सहभागी झाल्या आहेत.  तर 48 तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आझाद हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील पीडित नागरिकांच्या समस्या सोडवीण्यासाठी लोकशाही मार्गानेआंदोलना करीता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियमानुसार जागा द्यावी.जिजामाता प्रेक्षागार समोरील जागेत आंदोलनकर्त्यांना धमक्यांचे सत्र सुरू आहे. महिला आंदोलकांची कुचंबना होत आहे. आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूप घेत आहे.जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मुलींचा शोध घ्यावा,आकडेवारी जाहीर करावी.यासह जिल्ह्यातील अवैद्य धंदे, वाहतूक, रेती तस्करी बंद करावी. राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणी पोलीस आणि बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयाने अहवाल जाहीर करावा. शहरात महिलांसाठी मोफत प्रसाधन गृह सुरू करावे. प्लास्टिक वरील बंदीची अंमलबजावणी करावी. दाभाडी हत्या प्रकरणातील पीएम रिपोर्ट पुन्हा बनवावा. वारी हनुमान येथील दरोड्याची चौकशी करावी. शहरातील नाल्या रस्ते स्वच्छता करून,डजबीन ची व्यवस्था करावी. यासह नागरी मूलभूत ज्वलंत समस्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड, आझाद हिंद महिला संघटना, मातृतीर्थ रणरागिणी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आमरण उपोषण आंदोलनाला 22 मार्चपासून जिजामाता प्रेक्षागर समोर सुरुवात करण्यात आली आहे. 

Previous Post Next Post