जळगाव जा. खरेदी विक्री संस्थेच्या उपाध्यक्षपदी शांताराम धोटे यांची अविरोध निवड...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी शांताराम धोटे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. दिनांक १३ मार्च बैठक पार पडली.यावेळी उपाध्यक्ष पदाची चर्चा करून उपाध्यक्षपदा करिता एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया अविरोध करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंध सहकारी संस्था जळगाव जामोद यांनी काम पाहिले तसेच संस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद वायझोडे यांनी सहकार्य केले निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर संस्थेच्या मुख्यालयामध्ये स्वागत समारंभ पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार नेते प्रसेंनजित पाटील उपाध्यक्ष पणन महासंघ तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हे होते.
यांच्यासह ख.वि.स चे अध्यक्ष विठ्ठल वाघ,शिवसेना उबाठाचे दत्ता पाटील, तुकाराम काळपांडे,तालुकाप्रमुख गजानन वाघ, अरुण पारवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचीत उपाध्यक्ष शांताराम धोटे यांचा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित उपाध्यक्ष शांताराम धोटे यांचा सत्कार दत्ता पाटील सहसंपर्क प्रमुख शिवसेना ऊबाठा गजानन वाघ तालुका प्रमुख शिवसेना विश्वास पाटील विधानसभा प्रमुख राष्ट्रवादी शरद पवार गट विठ्ठल वाघ अध्यक्ष खरेदी विक्री संस्था जळगांव जामोद रमेश ताडे, अरुण पारवे वंचीत बहुजन आघाडी, तुकाराम काळपांडे उपाध्यक्ष शिवसेना उबाठा, विजय ठाकरे, दत्ता डिवरे, आशिष वायझोडे, इरफान शेट्टी, विजय काळे,राजू बाप्पू देशमुख,गुणवंत पाटील, सुरेश उगले, भीमराव पाटील, उल्हास माहोदे संचालक कृ. ऊ. बा. स. जळगांव जामोद,मंगल डोंगरदिवे संजय दंडे सह संस्थेचे सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.

