जळगाव जामोद ची दिपाली आटक स्टार प्रवाह टीव्ही च्या शुभ विवाह सिरीयल मध्ये...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
सातपुड्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेल्या जळगाव जामोद येथील दिपाली राजेंद्रकुमार आटक ने मुंबईत अभिनय क्षेत्रात नावलौकिक केलेले असून स्टार प्रवाह मराठी टीव्हीवर सुरू असलेल्या शुभ विवाह या नामांकित सिरीयल मध्ये भूमिका करत आहे. तसेच दिपाली आटक ची कपिल शर्माच्या शो मध्ये सुद्धा भूमिका आहे. मुंबईला दिपालीने ॲक्टींग व्यतिरिक्त मॉडेलिंग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे.मुंबई व्यतिरिक्त दिल्ली, पुणे अशा नामांकित शहरांमध्ये दिपाली आटक चे मॉडेलिंग चे शोज होत आहेत. तसेच तनिष्क गोल्ड डायमंड ज्वेलरी चे ब्रँड करिता ज्वेलरी घालून दिपाली ने रॅम्प वॉक सुद्धा केलेला आहे. याशिवाय मुंबई येथील ललित फाईव्ह स्टार मध्ये तिला शोज स्टॉपर करिता आमंत्रित करण्यात येते. दिपाली आटक चे मुंबई मधूनच नाही तर जळगाव जामोद शहरातून सुद्धा अभिनंदन आणि कौतुक होत आहे. सर्व स्तरातून दिपाली आटक च्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
