मुलींमध्ये सौंदर्य न घडवता तिची ताकद वाढवा, ती एक अबला नसून या देशाचे उज्वल भविष्य घडविणारी शक्ती आहे..जिजाताई राठोड चांदेकर.. सन्मान नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...


 
मुलींमध्ये सौंदर्य न घडवता तिची ताकद वाढवा, ती एक अबला नसून या देशाचे उज्वल भविष्य घडविणारी शक्ती आहे..जिजाताई राठोड चांदेकर.. सन्मान नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी:-

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ९ मार्च रोजी जळगाव शहरातील नगरपरिषदेच्या सांस्कृतिक भवनामध्ये व्हिडिओ वॉलेंटियर्स च्या सौजन्याने विनोद वानखडे व फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने तसेच जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्ती पुरस्कार सोहळा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाताई राठोड चांदेकर तर कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे तसेच प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर लताताई भोसले बाहेकर, तसेच वरवट बकालच्या सरपंच सीमाताई वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात नोकरी, राजकारण, समाजकारण, व तळागळात काम करणाऱ्या कर्तुत्ववान महिला भगिनींचा स्मृतिचिन्ह मानपत्र देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी डॉक्टर मोना ताई ची मोठे यांनी जागतिक महिला दिना संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले तर डॉक्टर लताताई बाहेकर यांनी आपल्या मार्गदर्शन मार्ग भाषणामध्ये सांगितले की नारी शक्ती जी दातृत्व,कर्तृत्व, मातृत्व तसेच नेतृत्व या चारही बाजूने निसर्गाने नटवलेली एक अद्भुत शक्ती आहे तिच्याशिवाय जग अपूर्ण आहे स्त्री शक्ती ही पुरुष शक्ती पेक्षा वेगळी नसून समानच आहे दोन्हीही शक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत तसेच जिजाबाई राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणावेळी मुलींमध्ये सौंदर्य न घडवता तिची ताकद वाढवा, ती एक अबला नसून या देशाचे उज्वल भविष्य घडविणारी शक्ती आहे त्यामुळे तिला अबला नव्हे तर सबला बनवा. ज्यामुळे ती स्वतः खंबीरपणे स्वतःचे रक्षण करणारी बनली पाहिजे मुलीच्या कर्तुत्वात जो कोणी आडवा येत असेल त्याला आडवा करणे ताकद माता भगिनींनी त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे असे ते यावेळी म्हणाल्या.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनगाव येथील जिल्हा परिषद शिक्षिका अस्मिता कोकाटे यांनी केले तर प्रास्ताविक आयोजक विनोद वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऋतुजा इंगळे बीएसडब्ल्यू महाविद्यालय मलकापूर या विद्यार्थिनींने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंच जळगाव ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने,जी.के.मोरे, अभय मारोडे, मीनाताई सातव, विजय पोहनकर, मिलिंद वानखडे, प्रशिक वानखडे, यशवंत झुंजारे व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post