नांदुरा रेल्वे ब्रिज जवळ सिग्नल पोलला गळफास घेऊन ६५ वर्षिय इसमाची आत्महत्या -पोलीसांनी केले ओळख पटवण्याचे आवाहन...


 
नांदुरा रेल्वे ब्रिज जवळ सिग्नल पोलला गळफास घेऊन ६५ वर्षिय इसमाची आत्महत्या -पोलीसांनी केले ओळख पटवण्याचे आवाहन... 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी-

रेल्वे स्टेशन नांदुरा जवळील भुईशिंगा शिवारातील रेल्वे ब्रिज जवळ कि मि. नं. 522/22-24 मध्ये सिग्नल पोलला एका अज्ञात अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .आज दिनांक 20/3/2025 रोजी 2:30 वाजताच्या पूर्वी घडली असल्याचे समजते याबाबत रेल्वे स्टेशन नांदुरा येथील उप स्टेशन प्रबंधक यांनी माहिती दिल्यावरून नांदुरा पोलीस स्टेशनचे ए एस आय संजय डाबेराव व कल्पना गिरी व ओमसाई फाउंडेशन नांदुरा येथील ॲम्बुलन्स सह स्वयंसेवक विलास निबोळकर,नितीन ठाकरे,कृष्णा वसोकार ,गणेश बोचे, बाळू राऊत घटनास्थळी हजर झाले सदर मृतक हा अंदाजे वय ६५ वर्षिय असुन रंग गोरा, मध्यम बांधा, अंगात लाल कलरचे शर्ट व काळा नाईट पॅन्ट घातली असून मृतकाची ओळख पटवण्याचे आवाहन नांदुरा पोलीसांनी केले असून सदर मृतकाचे प्रेत मलकापूर येथील सरकारी दवाखाना येथे शीतगृहात ठेवले आहे. संबंधित व्यक्तीस जो कोणी ओळखत असेल त्यांनी संपर्क पो.हवालदार संजय डाबेराव क्रमांक 9689918642 विलास निंबोळकर ओम साई फाउंडेशन अध्यक्ष मोबाईल क्रमांक 9422883911 या नंबर वरती कॉल करून मृतक इसमाची माहिती द्यावी. असे आवाहन नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post