मेळघाटातील पुष्कळ आदिवासी बांधवांची होळी अंधारात...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
मेळघाटातील मनरेगा चे कामाचा मोबदला पुष्कळ आदिवासी बांधवांच्या खात्यात दि.१२/३/२०२५ला जमा नाही झाल्या मुळे काही आदिवासी बांधवांची होळी अंधारात जात असल्याने मेळघाटातील पुष्कळ आदिवासी बांधव त्यांची नाराजी व्यक्त करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.काही आठ दिवसांपूर्वी राजकीय नेताचा कामाचा दणका आपल्याला वाटशाफ वर आणि वृत्तपत्रात असे उल्लेख आपल्याला वाचायला मिळाले आहे आणि तो वाक्य RC 24news चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी यांच्या कडे जपून ठेवले आहे.आदिवासी बांधवांचे नरेगा चा कामाचा मोबदला आज दि.१२/३/२०२५ रोजी काही लोकांचे चार ते पाच मस्टर असे जमा झाले आहे.
काही लोकांचे तर मनरेगाचे कामाचा मोबदला शुन्य दिशुन येत आहे.या कारणांमुळे काही आदिवासी बांधवांची होळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.आदिवासी बांधवांन कडुन बोलले जात आहे की कामाचा दणका आणि काम करणे यांच्यात जमिन आसमानाचा फरक आहे.जे गरीब लोक काम करतात त्यांनाच माहीत होते की कीती मेहनतीने पैसा कामावावे लागते.ज्यांच्या तोंडात येते तो बोलून जाते!
फक्त आप आपला श्रेय घेण्यासाठी अशा वक्तव्य राजकीय नेते करीत असतात. असे बोलणे जिल्हा परिषद सर्कल टेब्रुंसोडा येथिल आदीवासी बांधवाचे आहे.
मेळघाट विधानसभा आमदार केवलराम काळे यानी पण आदिवासी बांधवांची होळी अंधारात न जाता उजेडात जाण्यात यावी या करीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेत आदिवासी बांधवांचे मनरेगाचे कामाचे पैसे त्याच्या खात्यात लवकरात लवकर वळती करण्यात यावे असा पाठपुरावा आमदार केवलराम काळे यांनी केला आहे. तसेच कलोकसभा अमरावती खासदार बळवंत वानखडे यांनी पण मुंबई मंत्रालय येथे जावून आदिवासी बांधवांची होळी अंधारात जावू नये म्हणून नरेगा सचिव यांच्या कडे पाठपुरावा केला आहे.परंतू आज दि.१२/३/२०२५ रोजी काही मोजक्याच मजुर वर्गांच्या खात्यात ४ते६ मस्टर चे पैसे जमा झाले आहे.आणि कामाचे मस्टर दहा पर्यंत आहे.असे म्हणने मजुर वर्गाचे आहे.बाकी मजुर वर्गाचे मनेरगा चा कामाचा मोबदला नाही मिळाला तर याला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
