बापुमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयामध्ये जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा...


 
बापुमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयामध्ये जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे संस्थेचे अध्यक्ष ॲड. सलीम बापूमिया पटेल यांच्या प्रेरणेने तसेच संस्थेचे सहसचिव श्री. रब्बानी देशमुख सर व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्या डॉ. फराह शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामधील प्राणीशास्त्र विभाग संयुक्त विद्यमाने सातपुडा नेचर्स क्लब व अंतर्गत मूल्यमापन समितीने दि. २0 मार्च २०२५ रोजी "जागतिक चिमणी दिवस" उत्साहात साजरा करण्यात आला.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्या डॉ. फराह शेख या होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना डॉ. फराह शेख यांनी मागील दोन दशकापासून निसर्गातील चिमण्यांची संख्या ही खूप झपाट्याने कमी होत आहे, सोबतच इतर पक्ष्यांची संख्या सुद्धा कमी होताना दिसत आहे असे सांगितले. चिमण्या सोबत इतर पक्षी हे निसर्गातील अन्नसाखळी चे एक अविभाज्य घटक आहेत व त्यांची संख्या कमी झाल्यास अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होतो असेही त्यांनी सांगितले.प्राणिशास्त्र विभाग मधील प्रा. प्राजक्ता बाठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कडक उन्हाळ्यामध्ये निसर्गात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बरेच पक्षी आपला जीव गमावतात यावरण विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले. असे असताना आपण निसर्गातील एक घटक म्हणून चिमन्यासोबत इतर पक्षांना खाण्यासाठी दाणे व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे व त्यांचा जीव वाचविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले.

   महाविद्यालयाचे डॉ. आनंद जाधाव व प्रा. मनोहर जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना असे सांगितले की, फक्त पक्षांचे प्राण वाचविण्याची शपथ घेऊन आपली जबाबदारी संपत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गावामध्ये, समाजामध्ये चिमण्यासोबत इतर पक्षांच्या संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करावी तरच आपण जास्तीत जास्त पक्ष्यांचे जीव वाचवू शकतो व त्यांचा निसर्गातील समतोल राखू शकतो असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी मातीचे पिण्याच्या पाण्याचे भांडे महाविद्यालयाच्या परिसरामधील झाडांवर लावून त्यामध्ये पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व दाण्याची व्यवस्था केली. यासोबतच चिमण्यांना व इतर पक्षांना वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता बाठे यांनी केले तसेच प्रा. नितीन असोले यांनी आभार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच डॉ. चेतन पलन, डॉ. निखिल अग्रवाल, प्रा. मनोहर जांभळे, प्रा. डॉ. दिपाली सिरसाट, डॉ. बाबाराव सांगळे, व प्रा. शकील खान सोबतच महाविद्यालयांमधील प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post