हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा,हिवरखेड पत्रकार संघाची मागणी...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी..
हिवरखेड येथील तरुणांचा आकोल्यातिल झालेल्या हल्ल्यात मुत्यु झाला, तर जेष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर सुद्धा भ्याड हल्ला भुट्टे चोर ,दारुड्यानि केला व ते जखमी झाली, असे हल्ले न व्हावे या हल्ल्याना आळा बसावा याकरिता पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी हिवरखेड पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली, हिवरखेड येथील पत्रकार संघाच्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले , हिवरखेड येथील तरुणावर आकोल्या हल्ला झाला ,हेमंत गावंडे या युवकाचे या हल्ल्यात प्राण गेले, तर जेष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर सुद्धा हल्ला झाला व ते जखमी झाले, पोलीस बांधवांनी हल्लेखोरांनवर कठोरपणे कारवाई करून या अशा घटनेना आळा घालावा याकरिता, हिवरखेड येथील आदर्श पत्रकार संघाचे व ग्रामीण पत्रकार संघटनाचें पत्रकार यांनी पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार पो, जाधव साहेब, प्रफुल पवार, धीरज साबळे, यांच्याकडे निवेदन दिले, यावेळी पत्रकार राजेश पांडव,संदीप इंगळे, अनिल कवळकार, धिरज बजाज , जितेश कारिया , सूरज चौबे,अर्जुन खिरोडकार उपस्थित होते,
