एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत सुनगांवात अंगणवाडीचा पोषण पंधरवाडा कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जळगाव जामोद अंतर्गत जामोद बीटचा मुख्यमंत्री शंभर दिवसपूर्ती आराखडा या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी पोषण पखवाडा चे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सूनगाव येथे दिनांक २२ एप्रिल रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉक्टर अपर्णा कुटे,प्रमुख पाहुणे संदीप कुमार मोरे गटविकास अधिकारी जळगाव जामोद पंचायत समिती, अध्यक्षस्थानी रामेश्वर अंबडकार सरपंच सुनगांव ग्रामपंचायत,कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रमोद मानकर बालविकास प्रकल्प अधिकारी,जामोद बीट पर्यवेक्षिका सौ रेखा वानखडे ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे, लता तायडे शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे,शाळेचे मुख्याध्यापक बेग सर, उर्दू शाळा मुख्याध्यापक मजहर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविकांनी पोषण आहाराचे महत्व माता पालकांना समजावे म्हणून विविध प्रकारचे स्टॉल या कार्यक्रमांमध्ये लावले होते. उपस्थित गरोदर माता व महिलांना आहाराविषयी आरोग्य विषयी सखोल असे मार्गदर्शन यावेळी डॉक्टर अपर्णा कुटे यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेषा जामोद सर्कलच्या पर्यवेक्षिका रेखा जयदेव वानखडे यांनी सादर केली.अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रेकर याद्वारे अंगणवाडीतील सर्व कामे ऑनलाईन करावी लागतात त्यामध्ये फोटो प्रमाणे व ई प्लस ई केवायसी झाल्याशिवाय मुलांना आहार वाटप करायचा नाही अशा शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविकांना आहार वाटपामध्ये पारदर्शकता यावी म्हणून Facial Recognition System द्वारेच लाभार्थ्यांना टी एच आर वाटप करायचा आहे तो अंगणवाडी सेविकांचा उत्साह वाढवा आणि इतर सेविकांना प्रेरणा मिळावी म्हणून एचआरएस चे काम शंभर टक्के झालेल्या सेविकांचा सत्कार डॉ.अपर्णा कुटे,गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी मानकर, सरपंच रामेश्वर अंबडकार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सर्व आयोजन व नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल जामोद सर्कलच्या पर्यवेक्षिका रेखा जयदेव वानखडे यांचा डाँ.अपर्णा कुटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका क्षीरसागर मॅडम यांनी केले तर संचालन अंगणवाडी सेविका चंदा चिंचोलकर यांनी केले. आभार अनुसया वडाळे यांनी मानले. कार्यक्रमाला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका रेखा वानखडे,अर्चना वावगे,गीता मानगावकर, सुनिता वानखडे यासह जामोद बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच माता पालकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.