जळगाव जामोद येथील राधे कोल्ड्रिंक्सला भीषण आग... संपूर्ण दुकान जळून खाक.. आगीत कोट्यावधीचे नुकसान...
जळगाव जामोद प्रतिनिधी ...
जळगाव जामोद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील राधेय कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानला आज दिनांक 12 मे रोजी पहाटे चार ते साडेचार च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली या आगीमुळे प्रतिष्ठानचे करोडोचे नुकसान झाले असून संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. तर इतर प्रतिष्ठानलाही हानी पोहोचली आहे.याबाबत माहिती अशी की पहाटे चार साडेचार च्या दरम्यान ही आग स्थानिक नागरिकांना दिसून आली.पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या प्रतिष्ठान मध्ये आग लागल्यामुळे पोलीस स्टेशनचे ड्युुटीवरी सर्व पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी धावत आले तात्काळ जळगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले. यावेळी जळगाव जामोद पोलिसांनी मलकापूर व शेगाव येथील अग्निशामक दलाला या ठिकाणी बोलावले होते तिन्ही गाड्यांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळविले.पहाटेची वेळ असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच हवा आणि वादळ नसल्यामुळे इतरत्र आगीचा विस्तार झाला नाही.साधारणता नऊ वाजे दरम्यान आग विझविण्यात यश आले. तसेच आगीदरम्यान दोन-तीन वेळा सिलेंडरचे स्फोट झाले असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.