बँकेत एकापेक्षा जास्त खाती असलेल्या संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी खाती चेक करा..
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
संजय गांधी योजना / श्रावण बाळ योजना मध्ये असलेल्या लाभार्थ्याचे ऐका पेक्षा जास्त खाते असल्यास त्यांनी संबंधित सर्व खात्यामधील बॅकेत जावून चौकशी करावे . या आधि या योजनांचे वेतन ज्या बॅके त येत होतं तेथे जमा झालेल्या नसल्यास त्याचेकडे असलेल्या दुसऱ्या खात्यांत बऱ्याच लाभाथ्याचे वेतन जमा झालेले आहे काही लाभार्थी यांचे कडे मनरेगा चे कार्ड आहे त्याचे बरेच खाते हे पोस्ट ऑफीस मध्ये उघडलेले असून तेचे आधार सर्व प्रथम लिंक झाले त्या खात्यात सुद्धा वेतन जमा झाले . काही महिला लाभार्थी यांचे बचत गटाचे खाते आहे तेथे वेतन जमा झाले असेल गावातील इतर लाभार्थ्यांचे वेतन जमा झाले आपला का झाले नाही याचा विचार न करता आपल्या कडे असेलेल्या इतर बॅक पोस्ट ऑफीस येचे जावून वेतनाची चौकशी करावी तसेच ज्या लाभार्थ्याचे DBT Registion तसेच validation राहीलेले अशा लाभार्थ्यानी संबंधित गावाचे तलाठी ' कोतवाल यांच्याशी सपर्क साधावा . । किवा तहसिल कार्यालय अकोट येथे सुरु करण्यांत आलेल्या Help Desk सहायता कक्षामध्ये संपर्क साधावा .
