निलेश दादा शर्मा – एक सच्चा दोस्त, कार्यक्षम सहायक...
जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजयजी कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेशदादा शर्मा यांचा आज वाढदिवस. निलेशदादा हे नाव जितके साधं, तितकंच त्यांचं मनही निर्मळ, पारदर्शक आणि लोकाभिमुख आहे. त्यांनी राजकारणात असताना कधीही भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना आमदार कार्यालयात आलेल्या प्रत्येक माणसाशी आदरपूर्वक वागणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, आणि शक्य त्या सर्व पातळ्यांवर मदत करण्याचा प्रयत्न करणं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. त्यांचा संयम, नम्रता आणि तत्परता या गुणांमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे.मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली आणि या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जळगाव जामोद नगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामांसोबतच शहरवासियांच्या समस्या सोडवण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली. नागरिकांच्या अडचणींसोबत त्यांनी वैयक्तिक नातेसंबंधांचीही जपणूक केली.बालपणापासूनचे मित्र, जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि शेगावमधील कार्यकर्ते यांच्यासोबतचा त्यांचा स्नेह कायम असून ते मित्रांच्या सुख-दुःखात हमखास उपस्थित असतात. ही नाती जपण्याची, लोकांना साथ देण्याची आणि मदतीसाठी नेहमी तयार असण्याची कला निलेश दादांना विलक्षण यशस्वी बनवते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी यशाची प्रार्थना!