जळगाव जामोद मध्ये तिरंगा रँलीला भरघोस प्रतिसाद... रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर...


 
जळगाव जामोद मध्ये तिरंगा रँलीला भरघोस प्रतिसाद... रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

भारतीय सैन्य सैन्य दलाच्या सन्मानार्थ जळगाव जामोद शहरात भाजी पाव व सकल भारतीय च्या वतीने आज सायंकाळी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर झाला तिरंगा राहिलेला जळगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.जम्मू-कश्मीरमधील पहलगाम परिसरात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड आणि अमानवी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या धडक मोहिमेत सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवत सुमारे १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा केला आहे. या यशस्वी कारवाईने देशवासीयांचे मन अभिमानाने भरून आले आहे.या धाडसी आणि निर्णायक मोहिमेमुळे जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांततेचा श्वास घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भारतीय सैन्याने केवळ दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्याचे कामही केले आहे.या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे आज (ता. १९ मे) भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा जागर केल्याची भावनिक उद्गार आ डाॅ संजय कुटे यांनी व्यक्त केले.या रॅली त राजूभाऊ कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,बंडु पाटील ,डॉक्टर किशोर केला, कैलास पाटील, संजय पांडव,निलेश दादा शर्मा, पंकज कड,परीक्षित ठाकरे, शाकीर खान,संजय भुजबळ, देविदास घोपे,बाबाजी टावरी,बाळु पाटील,राजु हिस्सल, मोहनसिंह राजपुत,आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

Previous Post Next Post