राजस्थानात छ.संभाजीराजांची जयंती साजरी...सामाजिक जबाबदारी समजून वागल्यास सकारात्मक बदल होतील- न्यायमूर्ती रजनी...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
राजस्थानात कोटा येथे महाराष्ट्र पालक मित्र मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांची३६८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.अध्यक्षस्थानी मंडळाचे प्रमुख तथा सायकॉलॉजिस्ट किशोर वाघ हे होते.तर उद्घाटक म्हणून बोलताना मा.जिल्हा सत्र न्यायाधीश रजनी ब्रिजेश म्हणाल्या की प्रत्येकाने छत्रपती संभाजी राजांसारखी समाजाप्रती आपली जबाबदारी समजून आजच्या काळात कुटुंबासाह शक्य तितकी सामाजिक जबाबदारी पार पाडावी.त्यासाठी पैसेच लागतात असे नसून आपण ज्या क्षेत्रात जाणकार आहोत त्या क्षेत्रात सहजच इतरांना सोबत घेतलं पाहिजे यातून नक्कीच सकारात्मक बदल घडतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीमाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा बोलतांना रेखाताई वानखडे यांनी छत्रपती संभाजी राजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.नंंतर करिअर संवाद कार्यक्रमात आयआयटी एनआयटी सह अभियांत्रिकी करियर संधींवर प्रश्नोत्तरांसह समुपदेशक प्रशांत शिंपी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात किशोर वाघ म्हणाले की स्वराज्य निर्माते व रक्षक दोन्ही छत्रपतींचे विचार आणि आचार जगभरातील माणसांच्या कल्याणासाठी असून त्यांना जातीधर्मात बंदिस्त न करता उदात्त हेतूने अभ्यासून,हा वारसा जोपासून प्रेरणा घेणे,ही काळाची गरज आहे.सूत्रसंचालन अध्यापक दीपक शिंदे तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रकाश देशमुख यांनी केले.कार्यकम मोठ्या संख्येने महाराष्ट्रीयन महिला आणि पुरुषांच्या भरगच्च उपस्थितीने यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र पालक मित्र मंडळ,कोटाचे सदस्य सर्वश्री प्रधानाचार्य नरेंद्र वानखडे,संतोष घानखेडे,अर्जुन नरवाडे, महेश जैन,सुशील ढाकणे, विलास खंदारे,अनंता गावंडे,गणेश सुरुशे, विजय बोरे,विष्णू लहासे, सुनील धदंर,राजेंद्र सानप,दिनेश केचकर, राजूभाऊ बोरकर,स्वाती सावंत,एस.पी.दादेराव आदींनी अथक परिश्रम घेतले.