चुर्णी पशुवैद्यकीय रुग्णालयातील मोठा घोटाळा: कंत्राटदाराच्या मनमानी आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले...
राजु भास्करे / अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अश्या शब्दात त्यांनी म्हटले .या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती, सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांना पत्र लिहिले आहे. परंतु अद्यापपर्यंत संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही.कोणतेही शासकीय काम सुरु होत असतांना किंवा जुने बांधकाम तोडण्याकरिता काही शासकीय नियम, अटी असतात . प्रत्येक कामाचा अॅग्रीमेंट असतो ,कामाच्या ठिकाणी फलक असतो ,पण चूर्णी येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटल च्या बांधकामात शासनाद्वारे काही स्पेशल नियम काढले आहे असे वाटते.इथे कोणताही अॅग्रीमेंट नाही व इस्टीमेट ही नाही.ठेकेदार यांना फक्त आपल्या मनमर्जीने व हिटलर शाहीने काम करण्याचे परमिशन अधिकारी यांनी दिले असे दिसून येथे .कामाचे अग्रीमेंट दुसऱ्याचे नावाने आणी काम तिसऱ्या व्यक्तीचा नावाने.मेळघाटात खुलेआम शासनाच्या करोडो रुपयाचे भ्रस्टाचार अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरु आहे .कोणतेही जूने बांधकाम तोडन्यापूर्वी तेथील सर्व जुन्या साहित्याची सर्वासमोर नोंद केली जाते,गावातील ग्रामपंचायत येथे पत्र दिले जाते ,लीलाव प्रकिया होते ,पण या कामात असे दिसून आले नाही.हे बांधकाम तोडन्या अगोदर सम्बंधित पशुवैद्यकीय विभाग याने हि कोणतेही मलमत्ता याची विचारपुस केली नाही.किंवा कंत्राटदार याला विचारणा केला नाही.यामध्ये असे दिसून येते की हे सर्व प्रकारण अधिकारी यांचा संगमतीने होत आहे ,इथे कोणत्याही अधिकारी ,अभियंता यांचा वाच नाही.मेळघाट हे भ्रस्टचारीचे माहेर बनले आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही.पशुवैद्यकीय रुग्णालय चूर्णी चे जुने साहित्य ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागात जमा करून लिलाव केला जात नाही तोपर्यंत बांधकाम सुरू करू नये. भ्रष्ट अधिकारी, अभियंते आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि काम प्रामाणिक कंत्राटदारांना द्यावे.कंत्राटदाराच्या मनमानी आणि भ्रष्टाचारामागे कोणी वरिष्ठ अधिकारी आहे का? या प्रकरणात चौकशी आणि कारवाई होईल का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला वाट पहावी लागेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की या प्रकरणात भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे अस सामान्य नागरिकांचे मागणी आहे.