वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान..वादळी वाऱ्याने काही वेळ रस्ते पडले होते ओस...


 
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान..वादळी वाऱ्याने काही वेळ रस्ते पडले होते ओस...

गणेश भड/उपसंपादक आर सी २४ न्युज....

जळगाव जामोद तालुक्यात उन्हाचा पारा हा ४२ अंश डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असून उन्हाचा तडाखा बसत आहे त्यात आकाशात अवकाळी पावसाचे ढग सुद्धा मेघ गर्जनेसह हजेरी लावताना दिसत आहे. दिवसा कडक ऊन तर संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी असे विचित्र परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.दिनांक ६ मे रोजी दिवसभर कडक उन्हाचा पारा सहन केल्यानंतर संध्याकाळी ६ च्या सुमारास तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तालुक्यातील अनेक झाडांची पडझड झाली तर रस्त्यावर असणारे झाडांच्या फांद्या सुद्धा तुटून पडल्या त्यामुळे संध्याकाळी ६ ते ९ च्या दरम्यान तालुक्यातील वाहतूक ही जवळपास बंद झालेल्या स्वरूपातच आढळली. तर शेतकऱ्यांच्या शेती पिकामध्ये असलेल्या केळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . तर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये असलेल्या गुराढोरांचा चारापाणी सुद्धा या पावसामुळे ओला झाला आहे. तसेच तालुक्यात सर्वच गावात दिनांक ६ मे रोजी संध्याकाळ पासून विद्युत पुरवठा हा खंडितच होता. मात्र उखाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा पावसाच्या सरीमुळे वातावरणात गारवा झाल्याने दिलासा मिळाला.

--वादळी वाऱ्याने अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित--

तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक तारा आहेत तुटल्या असल्याने सुनगाव व इतर गावांत विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे नागरिकांना दिनांक ६ मे सम्पूर्ण रात्र ही अंधारातच काढावी लागली.सुनगाव येथील शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्याने शेती पिकाचे नुकसान झाल्याचे निवेदन जळगाव तहसीलदार यांना दिले आहे या निवेदनावर अनिता काळपांडे, कासाबाई मधुकर ढगे ,सोमेश कालपांडे, नारायण अकोटकर, मोतीराम कपले ,सविता निनाजी काळपांडे इत्यादी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post Next Post