संत शिरोमणी श्री गजानन महाराज सेवा भावी ट्रस्ट च्या तर्फे देविदास शर्मा यांचा आशिर्वाद रूपी सत्कार...

संत शिरोमणी श्री गजानन महाराज सेवा भावी ट्रस्ट च्या तर्फे देविदास शर्मा यांचा आशिर्वाद रूपी सत्कार...देविदास शर्मा यांना मिळालेला महाराष्ट्र भुषण पुरस्कार संपूर्ण जिल्हृयासाठी गौरव --- रमाकांतजी गलांडे...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

 खामगाव येथील आदिशक्ती नगर भागातील  संत शिरोमणी गजानन महाराज सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांना राष्ट्रीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार व इंडियन एक्सलन्स अवार्ड 2025 मिळाल्याबद्दल देविदास शर्मा यांचा आशिर्वाद रूपी सत्कार करण्यात आला जनसेवा प्रथम हे ब्रीदवाक्य अंगीकारून मागिल अनेक वर्षांपासून अनेकांना सुख दुःखात नेहमी साथ देणारे सामाजिक बांधिलकी ठेवून समाजॠण फेडण्यासाठी सदैव तत्पर. जनसामान्यांच्या मनात आपल्या सामाजिक कार्याव्दारे ठसा उमटविणारे. सामाजिक. धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर   निस्वार्थी श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या माध्यमातून सतिफैल व. खामगाव चे नांव दुरदुर  पर्यंत घेऊन जाणारे  देविदास ऊर्फ मुन्ना शर्मा यांचा १३ जुन २०२५ शुक्रवार रोजी सत्कार करण्यात आला भजनी मंडळाच्या माध्यमातून देविदास शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील २५ वर्षा पासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पणे " मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ " मे हे ध्येय घेऊन वर्ष भर विविध उपक्रम सुरू आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले व ही बाब संपूर्ण जिल्ह्या साठी गौरव आहे असे प्रतिपादन या वेळी रमाकांत गलांडे यांनी केले या वेळी श्री संत शिरोमणी गजानन महाराज सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने ट्रस्ट चे अध्यक्ष रमाकांत गलांडे यांच्या हस्ते देविदास शर्मा यांचा शाल. श्री फळ. पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री संत शिरोमणी गजानन महाराज सेवा भावी ट्रस्ट चे अध्यक्ष रमाकांत गलांडे. प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कब्बडी खेळाडू नरेंद्र मावळे.महेंन्द्र पाठक.सुभाष शेळके.कैलास बुंदेले. राजेंद्र शिंन्दे .तानाजी राऊत. संजय मोटे. एकनाथराव बोडखे. रामभाऊ गांडाळ. धनंजय मोहिते. संजय केळकर. अरूण कडवकर. अनिल गोलाईत. अजय ताकवाले  दिपक विभुते. विनोद लाहुडकर. जयेश मदने. गजानन शेवलकर. भाटे मामा. मोहनजी खंडेलवाल. अशोक क्षिरसागर. देविदास जाधव . नागोराव अवतार सर्व पदाधिकारी. सदस्य. उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास बुंदेले सर यांनी केले.अशी माहिती संत शिरोमणी श्री गजानन महाराज सेवा भावी ट्रस्टच्या वतिने देण्यात आली आहे

Previous Post Next Post