अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नांदुरा व मोताळा तालुका कार्यकारणी जाहीर...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
दिनांक 16/06/2025 रोजी सकाळी 11 वाजता नांदुरा येथील विश्राम भवनावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची नांदुरा व मोताळा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अ. भा.ग्रा. पत्रकार संघ आरोग्य समितीचे विदर्भ आरोग्य प्रमुख सुरजभैय्या यादव हे होते तर पत्रकार संघाचे कार्य धोरणाची याची माहिती बुलढाणा पूर्व जिल्हा अध्यक्ष राजू पाटील घाटे व जिल्हा सचिव संतोष कुलथे यांनी उपस्थितीत झालेल्या नवनियुक्त पत्रकार बांधवांना दिली. नंतर वरिष्ठाच्या मार्गदर्शनात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंडागळे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकृष्ण गावंडे, जिल्हा सल्लागार सिद्धेश्वर निर्मळ जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गजानन डाबेराव, यांच्या विशेष उपस्थितीत नांदुरा शहर अध्यक्षपदी प्रशांत पाटील, नांदुरा तालुका अध्यक्षपदी सोपान पाटील, नांदुरा तालुका उपाध्यक्ष पदी सुनील पवार , मोताळा तालुका अध्यक्षपदी शेख अफसर, मोताळा उपाध्यक्ष पदी सतीश नरवाडे, मोताळा कार्याध्यक्ष पदी विजय गायकवाड ,मोताळा ता सचिव पदी मुनिर खान, मोताळा ता प्रसिद्धी प्रमुख पदी विजय डोळे ,मोताळा ता सहसचिव पदी इमरान शहा ,मोताळा तालुका संघटक पदी निलेश दाभाडे, यांची निवड करण्यात आली व तसेच त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती सोपान पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.