अकोट आंतर राष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ग्राहक प्रबोधन सभा संपन्न...जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा -रमेश हिंगणकर...
अकोट तालुका प्रतिनिधी/सैय्यद शैकिल...
आंतर राष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त' जिल्हा सहकारी बँके द्वारा ग्राहकांचे हितार्थ विविध योजना राबविण्यात येत आहेत त्या योजनांचा बँकेच्या ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे जेष्ठ संचालक रमेश हिंगणकर यांनी केले. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ 'सहकारातून समृद्धी' अंतर्गत अकोट तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व शाखांच्या ग्राहकांकरिता ग्राहक प्रबोधन सभा संपन्न झाली.स्थानिक अग्रसेन भवन सभागृह आयोजित सभेस, ग्राहक, सभासद, ठेवीदार,कर्जदार,व्यावसायिक, सोसायटी पदाधिकारी, सहकारनिष्ठ व्यक्ती, बँकेचे हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश हिंगणकर होते तर जेष्ठ सहकार नेते हिदायत पटेल बँकेच्या संचालिका भारतीताई गावंडे, सहकारी जिनिंगचे अध्यक्ष सुभाष.वानखडे व उपाध्यक्ष रामदास थारकर, खविसचे उपाध्यक्ष शेषराव पाटील, कृउबास उपसभापती अतुल खोटरे आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांचे कुशल नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीत ग्राहकांचे हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. ही बाब.अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार हिदायत पटेल यांनी या प्रसंगी बोलले. भारतीताई गावंडे. अतुल खोटरे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे अकोट तालुका प्रमुख उमेश मोरे, सूत्रसंचालन मार्केटिंग ऑफिसर मंगेश काळे तसेच बँकेच्या डिजिटल व्यवहार व त्यांच्या सुरक्षिततेबाबत ग्राहक जागृतीबाबत मार्गदर्शन शाखाधिकारी आशिष घोम यांनी केले. आभार प्रदर्शन आशिष ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, निरीक्षक व सचिव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.