बुलडाण्यात आदिवासींचा विविध मागण्यासाठीआक्रोश मोर्चा...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
सकल आदिवासी समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 27जुन रोजी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने धडकला.या मोर्चात आदिवासी बंधू भगिनी, तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माळेगाव ता, मोताळा येथील आदिवासी समाजाचे घरे, शेती उध्वस्त करून आदिवासींना बेघर करणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.उलगुलान जारी रहेगा, आदिवासी एकतेचा विजय असो, बिरसा मुंडा की जय, जय समशेरसिंग पारधी, जय भीम च्या नाऱ्यांनी सर्व बुलडाणा नगरी दुमदुमुन गेली होती.
मोर्चातील प्रमुख मागण्या...
1, माळेगाव येथील आदिवासी बांधवांचे वनविभागाने उध्वस्त केलेली घरे त्याच ठिकाणी देण्यात यावे 2, आदिवासी जातीचे प्रमाणपत्र दाव्यात दाखल असताना गैर आदिवासी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांवर ॲक् ट्रा सिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे 3, माळेगाव येथील आदिवासीं बांधवांच्या शेती मध्ये वनविभागाने पाडलेली चरे पुर्ववत करून शेती वाहितीलायक करून देणे 4, माळेगाव येथील शाळा इतरत्र हलवण्यात येऊ नये, व अंगणवाडी पूर्ववत चालू करण्यात यावी 5, मोहेगाव येथील ग्राम समितीकडे प्रलंबित असलेली दाव्यानुसार मशागतीची परवानगी देण्यात यावी 6, घटनेतील अनुषेद 21 चे उल्लंघन करणाऱ्या व घरावर बल्डोजर फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मोर्चामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके,नंदांनिताई टारपे महाराष्ट्र अध्यक्ष महीला आघाडी,पवनराजे सोनवणे प्रदेश अध्यक्ष एकलव्य संघटना बाळासाहेब बरडे उपा अध्यक्ष,आशिष बाबा खरात सामाजिक कार्यकर्ते, राजेंद्र मोरे विदर्भ अध्यक्ष, कैलासभाऊ माळी नगर सेवक , दिलीपदादा मोरे विक्कीभाऊ गायकवाड जिल्हा अध्यक्ष, संदीपभाऊ पिपले , उखरडाभाऊ सोळंके, बाळुभाऊ डाबेराव आदि पदाधिकारी उपस्थित होते
