१ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना संत्रा लागवड तंत्रज्ञान व खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
कृषिदिन सालाबादाप्रमाणे याही वर्षांत माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी "कृषिदिन " साजरा करून त्यांनी कृषी क्षेत्रातील केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या कार्याची आठवण करून देत कृषि क्षेत्रातील त्यांनी केलेल्या भरीव कामाची उजळणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश दिनांक १६ जून २०२३ नुसार १ जुलै हा त्यांचा जन्मदिवस राज्यात कृषिदिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्यानुसार याही वर्षांत दिनांक १जुलै २०२५ रोजी "कृषिदिन" साजरा करण्याचे आदेश ग्रामविकास विभाग व कृषि विभाग यांना दिले आहेत. याबाबतीत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यक्रमाचे नियोजन करून त्याद्वारे विविध क्षेत्रातील व्यक्ती,शेतकरी व विभाग यांचा अंतर्भाव करून कार्यक्रम राबविण्याबाबतच्या सुचना आहेत.या कृषिदिनाचा उद्देश साध्य करण्यासाठी, नेहमीप्रमाणेच या वर्षात देखील रमेश जाधव, तालुका कृषि अधिकारी, जळगाव जामोद, जि,.बुलढाणा यांच्याकडून या कृषिदिनी शेतकर्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात येवून त्यात विद्यापीठातील व कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या समन्वयातून कृषीविषयक चर्चा सत्र व प्रशिक्षण वर्गांचे नियोजन करण्यात आले आहे.त्यात प्रामुख्याने संत्रा लागवड, त्यातील फळगळ समस्या,किडीवर रोग तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन यांसह खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिक व्यवस्थापन, केळी लागवड तंत्रज्ञान, नैसर्गिक पद्धतीने फळबागेचे व्यवस्थापन या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येवून कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रगतशील शेतकर्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे ठिकाण कृषि विज्ञान केंद्र, जळगाव जामोद, वेळ सकाळी 9.30 वाजता असून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकर्यांनी आवर्जून उपस्थित रहावेत.
