पिकवीमा प्रीमियम मध्ये असलेली तफावत दूर करा - राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाची मागणी...


 
पिकवीमा प्रीमियम मध्ये असलेली तफावत दूर करा - राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाची मागणी...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन व तुर ही पीके प्रामुख्याने घेतली जातात. महाराष्ट्र राज्यात पिकवीमा योजना राबविली जाते परंतु या पिकवीमा योजनेत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी प्रीमियम रक्कम असल्याचे निदर्शनात येते. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त प्रीमियम रक्कम ठेवण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी हैक्टरी 1160 रु शेतकर्याना भरावे लागतात, शेजारील अकोला जिल्ह्यात हिच रक्कम हेक्टरी 580 रु आहे,नंदुरबार जिल्ह्यात 412.50 रु हेक्टरी, सांगली जिल्ह्यात हेक्टरी 580 रु प्रीमियम भरावा लागतो. बुलढाणा जिल्ह्यातिल शेतकर्याची लूट ह्या पिकविमा कंपण्या व शासन करीत आहे. पिक संरक्षीत रक्कम सारखीच असतांना जिल्ह्यातील शेतकर्याना अधिकचा भूर्दड का दिल्या जातोय असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांनी तालुका कृषि अधिकारी यांना केला. लोकप्रतिनिधीच नाही लक्ष म्हणून जनता आहे त्रस्त त्यामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त असा घणाघात भालेराव यांनी केला. पिकवीमा प्रीमियम मधील तफावत दूर करुन आता पर्यंत शेतकर्यानी जी अधिकची रक्कम भरली ती शेतकर्याना परत करावी, पिकवीम्याची तारीख वाढवावी अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका कृषि अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फ़त शासनाला करण्यात आली. यावेळी प्रमोद सपकाळ, एम.डी. साबीर, आशिष वायझोडे,सौ. वर्षा वाघ, दत्ता डीवरे,वामन गुडेकर,सोपान आटोळे, एकनाथ गटमने, गजानन भालतडक,शिवाजी वाघ, मोईन राज यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post