शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..


 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २७ जुलै रोजी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने विविध समाजपयोगी  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे रुग्णांना फळ वाटप, ईश्वर शिवभोजन केंद्रामध्ये  नागरिकांना मोफत भोजन, जळगाव जामोद येथील गरजू व्यक्तींना मोफत कपड्यांचे वाटप, मराठी पूर्व माध्यमिक शाळा पिंप्रि येथे वृक्षारोपण, जळगाव जामोद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण,बांडापिंपळ येथे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,एलोरा येथे हनुमान मंदीरात दुग्धाभिषेक कार्यक्रम नवनियुक्त जिल्हाप्रमुख गजानन वाघ व नवनियुक्त जळगाव जामोद तालुका प्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वाखाली पडणार आहेत.शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना  तालुका भरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केले आहे.

Previous Post Next Post