स्व.पंकज देशमुख प्रकरणी जळगाव जामोद वासियांचा कडकडीत बंद..मृतकाच्या पत्नीने दिलेल्या संशयीत आरोपीवर कार्रवाई का होत नाही न्याय हक्क संघर्ष समितीचा सवाल....
जळगाव जामोद प्रतिनिधी...
स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्युची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक देण्यात आली होती. याबाबत न्याय हक्क जन आंदोलन समितीने एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे जाहिर केले होते. सदर आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव जामोद शहर वासियानी उस्फुर्त प्रतिसाद देत जळगाव जामोद शहर कळकळीत बंद ठेवण्यात आले. स्व. पंकज उत्तमराव देशमुख, भाजपा कार्यकर्ता जळगाव जामोद ह्याची 3 मे 2025 रोजी त्यांच्या वायाळ शिवारातील शेतात लहान झाडाला फाशी घेतल्याने मृत्यु झाल्याचे कोणतीही चौकशी न करता प्रथम दर्शनी दाखविले आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने या मृत्युची चौफेर बाजूने तपासणी न करता आत्महत्या असल्याचे पत्रकाराना सांगितले. मात्र स्व. पंकज उत्तमराव देशमुख यांचे कुटुंब व नातेवाईक त्यांची हत्याच असल्याचे आग्रही मत होते, आजही आहे. याबाबत न्याय हक्क जन आंदोलन समिती तसेच मृतकची पत्नी सुनिता पंकज देशमुख यांनी वेळवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना वारंवार सीआयडी मार्फ़त चौकशीची मागणी केली आहे व करीत आहे परंतु प्रशांसन त्याकड़े गांभिर्यने पाहत नाही असे पोलिसांच्या आजवरच्या तपासावरून दिसत आहे. त्याकरिता सर्व पक्ष, व सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रात असलेल्या संघटना यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार जनमताचा आदर करीत स्व. पंकज देशमुख व त्यांचे कुटुंबाला न्याय देण्याकरीता व प्रशासनाला जागे करण्याकरीता स्व. पंकज देशमुख यांच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी या मागणी करीता न्याय हक्क जन आंदोलन समिती ही 4 जुलै रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक दिली होती. यावेळी संशयीतांची नावे पोलिस प्रशासनाला दिली आहेत, संशयीतां मध्ये भाजपा पदाधिकार्याचा सुद्धा समावेश.- मृतक पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी खळबळजनक खुलासा केला.तसेच मृतकाच्या पत्नीने दिलेल्या संशयीत आरोपीवर कार्रवाई का होत नाही न्याय हक्क संघर्ष समितीने केला आहे.जळगाव जामोद मध्ये हत्येच तीसर चौथ प्रकरण, हत्येचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहेत. याच जनप्रक्षोभातून पंकज देशमुख प्रकरणी जनतेने हा लढा हाती घेतला आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी केला.पोलिस प्रशासनाने योग्य कार्रवाई केलेली नाही, चोर सोडून सन्यासाला फाशी म्हनी प्रमाणे प्रशांसन काम करीत आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर यांनी केले.काही भाजपा पदाधिकारी आंदोलन करत्यांना धमकावण्याच काम करीत आहेत असा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभय मारोडे यांनी केला.यावेळी प्रसेनजीत पाटिल, स्वाती वाकेकर, भाऊ भोजने, अजय पारस्कार,मनोज वाघ, अभय मारोडे, विश्वासराव भालेराव,प्रमोद सपकाळ,भाऊराव भालेराव, तुकाराम काळपांडे,भिमराव पाटिल, अर्जुन घोलप, अमर पांचपोर, ईरफान खान, सैय्यद नफिज,एजाज देशमुख, आशिष वायझोडे, अजहर देशमुख,संदीप मानकर, रतन इंगळे, बाबा टावरी,शेख जावेद,रमेश ताडे, तुकाराम गटमने, गजानन मांडेकर, संतोष डब्बे,मंगेश कतोरे यांच्यासह शेकडो जळगांव वासी या बंद मध्ये सहभागी झाले होते.