कामगारांची अडवणूक करणाऱ्या ग्राम सेवकांवर कार्यवाई होणार..!आझाद हिंद चे निर्दशने: परिपत्रक काढण्याची केली मागणी...


 
कामगारांची अडवणूक करणाऱ्या ग्राम सेवकांवर कार्यवाई होणार..!आझाद हिंद चे निर्दशने: परिपत्रक काढण्याची केली मागणी...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

जिल्ह्यातील कामगार कार्यालयात नोंदणीकृत कामगारांना पूर्णर नोंदणीसाठी आणि नवीन कामगारांना ग्रामसेवकाकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. या महत्वपूर्ण मागणीकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद हिंद च्या वतीने धरणे निदर्शने करीत आज 15 सप्टेंबरला जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले.

_

ग्रामसेवकांची मुजोरी कामगारांना वेठीस धरणारी..

काही दस्तुरखुद ग्रामसेवकांनी कार्यालयाबाहेर कामगार प्रमाणपत्रासाठी भेटू नये. असे फलक लावले आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील असंख्य गरीब कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर पर्यायाने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा खेळ खंडोबा ग्रामसेवकांच्या चुकीच्या धोरणांमुळे होत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि विविध संकटांमुळे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर पिचलेला  आहे. असे असताना ग्रामसेवकांच्या मुजोरीमुळे सामान्य गरीब कामगारांच्या परिवारावर शिक्षणापासून आणि शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.  अशा  ग्राम सेवकांच्या मुजोरगिरी मुळे कामगारांच्या मुला मुलींवर अन्याय होत आहे.

__

ग्रामसेवकांना आदेशित करण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढावे..


जिल्ह्यातील ग्रामसेवकांना शासन निर्देशाप्रमाणे कामगारांना प्रमाणपत्र वाटप करण्याचे स्वतंत्र परिपत्रक काढण्यात यावे. त्यानंतरही जिल्ह्यातील कामगारांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्बंध सुद्धा परिपत्रकात नमूद करावा.यासह इतर मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिणी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष प्रभू पवार यांना निर्दशनी निवेदन सादर करण्यात आले.जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी  आशिष प्रभु पवार यांनी आंदोलन कर्त्या शिष्टमंडळासोबत बैठक घेत चर्चा केली.मागण्यांची पूर्तता करण्यासाठी परिपत्रक काढण्याचे संबंधितांना आदेश दिले. या सह ग्रामीण भागातील रस्ते, पिण्याचे पाणी,साफसफाई अनुषंगाने त्वरित कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा जिल्ह्यातील प्रमुख बीडीओ यांना बैठकीदरम्यान तत्काळ देण्यात आले. यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील,जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राम व्यवहारे, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, मोताळा तालुका उपाध्यक्ष उल्हास काकर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष शितल जवंजाळ, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष सोपान ठाकरे, शेगाव तालुका अध्यक्ष योगेश कोकाटे, नांदुरा तालुका अध्यक्ष सागर अवचार, मोहम्मद सुफीयान, गोपाल काकर, सागर  कुयटे, जयश्री काकर, भगवान गिरी, शांताराम काकर, धनराज मोरे, संतोष घाटे, मनोज व्यवहारे  यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थितीत होते...

Previous Post Next Post