श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र विभाग अंतर्गत पोषण आहार स्पर्धा संपन्न...


 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र विभाग अंतर्गत पोषण आहार स्पर्धा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

गृह अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विकसित भारत पंधरवडा यांच्या संयुक्त विद्यमाने गृह अर्थशास्त्र विभागा अंतर्गत पोषण आहार स्पर्धा आयोजित करण्यात आली . दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी ही स्पर्धा घेण्यात घेण्यात आली. हा कार्यक्रम घेण्यामागचा मुख्य उद्देश मुलींना पोषण आहार संबंधी जाणी व्हावी तसेच त्यांच्यातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी हा होता या स्पर्धेत एकूण 30 मुलींनी आपला सहभाग नोंदविला यामध्ये मुलींना जे सहा अन्नघटक आहेत त्यातून एका अन्न घटकाचा पदार्थ तयार करून स्पर्धेत सहभागी झाल्या यामध्ये प्रथिन युक्त इडली, ढोकळा मिश्र कडधान्य उसळ शेंगदाणे चिक्की आणि मिश्र लाडू केले तर कॅलरीयुक्त घटकात साबुदाणा वडा बटाटा वडा यांचा समावेश होता तर जीवनसत्व युक्त अळूच्या पानांची वडी पालक पराठा मंचुरियन यांचा समावेश होता लोह व कॅल्शियम साठी तिळाची चिक्की कर्बोदकेयुक्त मिश्र भाकरी पोह्याचे लाडू व्हेजिटेबल पराठा यांचा समावेश करण्यात आला या स्पर्धेच्यांनी सहभाग घेतला त्यांनी सर्व पदार्थ सात्विक व उच्चभूजयुक्त केले तसेच सर्व या स्पर्धेतून महाराष्ट्र गुजरात पंजाब दक्षिणात्य या राज्यांची मुख्य डिश तयार केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे चित्र दिसून आले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर सर तर परीक्षक व मार्गदर्शक म्हणून केशव माधव विद्यामंदिरच्या प्राचार्या सौ सोनाली कुलकर्णी होत्या तर गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख अर्चना जोशी उपस्थित होत्या यासोबत महाविद्यालयाचे प्राध्यापक गवई सर प्राध्यापक चव्हाण सर प्राध्यापक उमरकर सर यावेळी उपस्थित होते. पोषण आहार कार्यक्रम स्पर्धा यांचे मार्गदर्शक सौ सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलींना सकस आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर निलेश निंबाळकर सर यांनी मुलींचा उत्साह वाढवला तसेच प्रत्येक प्रांताची डिश असल्यामुळे प्रत्येक प्रांताचा मुख्य आहार व राष्ट्रीय एकात्मता दिसून आल्याचे सांगितले तसेच मुलींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमात 25 मुलींनी आपला सहभाग नोंदविला होता त्यातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागताने झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अर्चना जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक उमरकर सर यांनी केले. हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी सौ मानसि कुलकर्णी , योगेश तायडे व गृह अर्थशास्त्र विभाग अभ्यास मंडळाची कार्यकारणी यांनी अथक प्रयत्न केले व हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला.

Previous Post Next Post