केला & छोरिया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद मधील विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत दणदणीत सुयश...!

 केला & छोरिया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद मधील विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत दणदणीत सुयश...!

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या मैदानी स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगटात ५ कि.मी. चालण्याच्या शर्यतीत इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रसाद रतिपाल कचवे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.यासाठी शाळेचे अध्यक्ष डॉ. किशोरजी केला सर, शाळेच्या मुख्यसंयोजिका मा. डॉ.स्वातीताई केला मॅडम , प्राचार्य विनायक उमाळे सर, विनोद ईश्वरे सर, क्रीडा शिक्षक योगेश घुटे व आकाश निलजे यांनी अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यास भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post