जळगाव जामोद प्रतिनिधी....
दिनांक २७जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यात वादळी वारा पावसाने रब्बी गहू मका केळी पिकांचे व संत्रा फळबागेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे.यामध्ये कापणीला आलेला गहु हरभरा पिकांना तडका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला आहे सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी मका कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे या पिकांचे मंगळवारी झालेल्या पावसामुळे खूप मोठा फटका बसला आहे यामध्ये सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.बुधवार दिनांक २८/१/२०२६ रोजी तहसीलदार जळगाव जामोद चे तहसीलदार श्री पवन पाटील, कृषी अधिकारी श्री जाधव , कृषी सहाय्यक श्री शेगोकर, पटवारी श्री वाघ, श्री सोळंके, ग्रामसेवक श्री चौधरी, कृषिमित्र यांच्यासह समाधान दामधर , दिनेश ढगे, रमेश हागे, मोहन राजपुत, रामेश्वर अंबळकर यांचे सह अनेक शेतकरी यांनी बांधावर जाऊन पाहणी केली जळगाव जामोद तालुक्यातील रब्बी पिकांची अतुल नुकसान झाले आहे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे .यावेळी प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर करून तत्काळ सरसकट पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
_____________________________
सरकारी मदत तसेच विमा धारक शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी..
समाधान दामधर
